भारताच्या विजयाची पूर्ण कहाणी, फक्त एकाच क्लिकवर

सामन्याच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराने भेदक मारा केला.

बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले.

युजवेंद्र चहलने भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.

युजवेंद्रच्या चार विकेट्स भारतासाठी महत्वाच्या ठरल्या.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर, कोहली आणि राहुल हे बाद झाल्यावरही रोहितने एका बाजूने समर्थपणे कल्ला लढवला.

रोहितच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला.