Virat Kohli: १०५० कोटींचा मालक झाला विराट कोहली; जाणून घ्या कशी करतो कमाई!

आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीचा कमाईचा फॉर्म सुसाट सुरू आहे..

एका रिपोर्टनुसार विराट कोहलीची नेट वर्थ १०५० कोटी झाली आहे म्हणजेच तो १०५० कोटींचा मालक झाला आहे. तो BCCI कडून वर्षाला बक्कळ पगार घेतो, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही त्याला चांगली रक्कम मिळते.

३४ वर्षीय विराट कोहली इंस्टाग्राम व ट्विटर या सोशल मीडियावरही रेकॉर्ड ब्रेक फॉलोअर्स आहेत आणि तिथून येणारा इन्कम हाही बंपर आहे.

शिवाय त्याचे स्वतःचे काही स्टार्टअप्स आहेत आणि काहींना तो फंडही पुरवतो. याशिवाय मुंबई व गुरुग्राम येथे त्याची प्रॉपर्टी आहे. अनेक गाड्या आहेत आणि अनेक ब्रँड्सची तो जाहीरातही करतो.

StockGro या सोशल ट्रेंडिग प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्व्हेनुसार कोहलीची नेट वर्थ १०५० इतकी झाली आहे. विराट कोहली BCCI च्या A + करारात आहे आणि त्याला वर्षाला ७ कोटी रक्कम पगार म्हणून मिळतो. शिवाय त्याला एका कसोटीसाठी १५ लाख, एका वन डे साठी ६ लाख आणि एका ट्वेंटी-२० साठी ३ लाख मिळतात. RCB त्याला १५ कोटी पगार देतात.

विराट कोहली इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून ८.९ कोटी, ट्विटरवर २.५ कोटी कमावतो. त्याच्या स्वतःच्या One8 Commune restaurant, Nueva, Stepathlon याही कंपनी यासह पाच स्टार्टअप्स कंपनी आहेत. Wrognचा तो सहमालक आहे. इंडियन सुपर लीगमधील एफसी गोवा क्लबचा तो सहमालक आहे.

मुंबईत त्याचे ३४ कोटींचं घर आहे आणि गुरुग्राममध्ये ८० कोटींचं घर आहे. ब्रँड्स जाहीरातीसाठी तो ७.५० कोटी ते १० कोटी घेतो. विराट कोहीलने भारताकडून १०९ कसोटी, २७४ वन डे आणि ११५ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात ७५ आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने २३७ सामन्यांत ३७.२५ च्या सरासरीने सर्वाधिक ७२६३ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील सर्वाधिक ७ शतकं आणि ५० अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.