मादाम तुसाँ संग्रहालयात विराट कोहलीचा पुतळा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा मेणाचा पुतळा दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. कोहलीला अर्जुन पुरस्कार, आयसीसीचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, तसंच बीसीसीआयचे तीन पुरस्कार मिळालेत. भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे.

12 वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी पदार्पणापासून 19 वर्षांखालील विश्वचषक विजय व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारपदापर्यंतचा कोहलीचा प्रवास सुवर्णमय ठरला आहे.

मादाम तुसाँच्या कलाकारांनी नुकतीच कोहलीची भेट घेतली. लंडनहून आलेल्या जगविख्यात कलाकारांनी त्याचे माप घेतले. कोहलीनं सांगितले की, ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. मी मादाम तुसाँच्या टीमचे आभार मानतो.

सचिन तेंडुलकरचाही मेणाचा पुतळा या संग्रहालयात आहे.

कपिलदेव यांचा मेणाचा पुतळा