आयपीएलमध्ये दिग्गजांचा सपोर्ट स्टाफ

किंग्स इलेव्हन पंजाबने भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

संयमी फलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडणारा व्ही व्ही एस लक्ष्मण आता सनरायझर्स हैद्राबादचा मेंटॉर आहे. तर आपल्या फिरकीने फलंदाजांची भंबेरी उडवणारा मुथय्या मुरलीधरन हैद्राबादचा गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. टॉम मुडी या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर व भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धूरा समर्थपणे सांभाळणारे गॅरी कर्स्टन आता दिल्ली डेअर डेव्हिल्सचे प्रशिक्षक आहेत. कर्स्टन दिल्लीला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस व पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वासीम अक्रम ही दुकली सध्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कॅलिस कोलकात्याचा बॅटिंग कोच आहे तर अक्रम हा संघाचा मेंटॉर आहे.

क्रिकेट वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा डेनियल व्हिटोरी रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा मुख्य प्रशिक्षक आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅलन डोनाल्ड हा संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग सध्या चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक आहे. स्टिफनच्या नेतृत्वाखाली चेन्नईची यशस्वी वाटचाल सुरु असून फ्लेमिंग हा उत्तम प्रशिक्षक होऊ शकते हे त्याने आयपीएलमधून सिद्ध केले आहे.

क्रिकेट जगतात

अनिल कुंबळे मुंबई इंडियन्सचा मुख्य मेंटॉर असून रॉबिन सिंग हा सहाय्यक प्रशिक्षक आहे. तेजतर्रार व अचूक गोलंदाजीने स्वतःची ओळख निर्माण करणारा शेन बॉंड मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक असून जॉंटी -होड्स हा संघाचा फिल्डिंग कोच आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज क्रिकेटपटू आयपीएलमध्ये बॅक बेंचरची भूमिका निभावत आहे. संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये या खेळाडूंचा भरणा असून आता मैदानाबाहेरुन ही मंडळी आयपीएलमध्ये स्वतःची छाप पाडत आहे. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा आयकॉन असून रिकी पॉंटींग मुख्य प्रशिक्षक आहे.अशाच काही खेळाडूंवर टाकलेली एक नजर...