Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून निघाला जगातील सर्वात घातक गोलंदाज, वडील आजही चालवतात फळांचा गाडा

Umran Malik IPL 2022: उमरान मलिकच्या वेगाने संपूर्ण जगाला त्याच्याकडे आकर्षित केले आहे. काश्मीरचा हा युवा फलंदाज भारताचे भविष्य असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करच आहेत.

Umran Malik: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या मोसमात दररोज एकापेक्षा एक जबरदस्त सामने होत आहेत. यात भारताया युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

उमरान मलिकने आपल्या वेगाने संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित केले आहे. काश्मीरच्या या तरुण गोलंदाजाकडे भारताचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. येत्या काळात उमरात भारतीय संघात दिसू शकतो.

उमरान 150Kmph पेक्षाही जास्त वेगाने गोलंदाजी करत असून, त्याचे नाव जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये घेतले जात आहे. आयपीएल 2022 च्या 8 सामन्यात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे, उमरानला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही. सलेक्टर्सने उमरानची दक्षिण आफ्रीका दौऱ्यासाठी इंडिया-ए टीममध्ये निवड केली होती, पण दौऱ्यात त्याची निवड झाली नाही.

आयपीएलमध्ये मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या वेगाने चकीत करणाऱ्या या गोलंदाजासमोर बुमराह आणि शमीदेखील कमी वाटतात. पण, येत्या काळात आगामी साउथ आफ्रीका सीरीजमध्ये निवड होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, उमरान मलिक अतिशय गरीब कुटुंबातून येतो. त्याचे वडील आजही फळांचा गाडा लावतात. उमरानचे वडील अब्दुल रशीद म्हणाले, उमरानची कामगिरी पाहून मार्केटमध्ये त्यांना लोक खूप आदबीने बोल आहेत.

अब्दुल रशीद म्हणतात की, उमरान लहानपणापासून क्रिकेक खेळायचा, त्याला आधीपासूनच वेगवान गोलंदाज व्हायचे होते. त्यांना आता उमरानला वर्ल्ड कप खेळताना पाहायचे आहे.