UFC महिला चॅम्पियनचा प्रताप; अंघोळ करत चाहत्यांच्या प्रश्नांना दिली LIVE उत्तरं!

UFC या मिक्स मार्शल आर्ट्स चॅम्पियन पैगे व्हॅनझँट हीनं सोशल मीडियावर कहरच केला.

सोशल मीडिया हे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचं सोपं माध्यम.

पैगेनं असाच एक Q&A प्रश्नोत्तराचे सत्र सोशल मीडियावर आयोजित केले होते.

या सत्रात तिनं चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मनमोकळेपणानं उत्तर दिलं.

पैगेनं 12 मिक्स मार्शल आर्ट्स सामन्यांपैकी 8 मध्ये विजय मिळवला आहे.

पण, जानेवारी 2019नंतर ती मिक्स मार्शल आर्ट्सच्या रिंगपासून दूर आहे.

नुकतंच तिनं चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराचं सत्र आयोजित केले होते आणि त्यात तिनं लवकरच पुनरागमन करणार असल्याचेही जाहीर केले.

पण, प्रश्नोत्तराच्या या LIVE सत्रात पैगे ज्या अवस्थेत दिसली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

LIVE प्रश्नोत्तर सुरु असताना सुरुवातीला पैगे ठिकठाक होती. पण, जसजसा हे सत्र रंगत गेले, तसतसे चाहत्यांना धक्के बसत गेले.

LIVE सत्र सुरू असताना पैगे थेट तिच्या बाथरूममध्ये गेली आणि पत्नी ऑस्टीन व्हँडरफोर्डसोबत अंघोळ करता करता तिनं चाहत्यांच्या प्रश्नांना लाईव्ह उत्तर दिली.

पैगेचा हा प्रताप पाहून सुरुवातीला चाहतेही हडबडले. इंस्टाग्रामवर पैगेचे 2.4 मिलियन चाहते आहेत.