PHOTOS: पत्नीच्या वाढदिवशी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची खास पोस्ट, मानले आभार!

Ajinkya Rahane And Radhika Love Story: अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकरचा आज वाढदिवस आहे.

मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. मागील हंगामापासून तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग आहे. यंदाच्या हंगामात रहाणेला अद्याप तरी चमक दाखवता आली नाही.

अजिंक्य रहाणे आज त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला. त्याची पत्नी राधिका धोपावकरच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक खास पोस्ट केली आहे.

राधिका अनेकदा रहाणेला चीअर करताना प्रेक्षक गॅलरीत दिसली आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ ती अपलोड करत असते. राधिका आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

पत्नीच्या वाढदिवशी अजिंक्यने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा RADS... सतत सामर्थ्य आणि आनंदाचा स्त्रोत असल्याबद्दल तुझे धन्यवाद.

अजिंक्य आणि राधिका यांना दोन अपत्य आहेत. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ मध्ये झाले. दोन वर्षांपूर्वी अजिंक्य आणि राधिका राघव या त्यांच्या मुलाच्या रूपात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.

या मराठमोळ्या जोडीला २०१९ मध्ये एक मुलगी झाली. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी जुन्या बॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देणारी आहे.

हे दोघे बालपणीचे मित्र असून एकमेकांवर खूप प्रेम करतात. अजिंक्य आणि राधिका लहानपणापासून शेजारीच राहत होते. मागील काही काळापासून अजिंक्य रहाणे भारतीय संघापासून दूर आहे.

त्याला खेळाच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर वगळण्यात आले. मात्र, त्याला रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

अलीकडेच रहाणेच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने रणजी करंडक जिंकण्याची किमया साधली. मुंबईकरांनी विदर्भाचा पराभव करून ४२व्यांदा जेतेपद पटकावले.