प्रेमाला वयाचं बंधन नसतं, या क्रिकेटमधील कपल्सने करून दाखवलं

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने २०१४ साली लग्न केले. त्यावेळी शोएब ४२ वर्षांचा होता तर त्याची पत्नी रुबाबा ही फक्त २३ वर्षांची होती.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी ही त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये १० वर्षांचा फरक आहे. धवन हा बायकोपेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी दीपिका पल्लीकल यांच्यमध्ये सहा वर्षांचे अंतर आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने लग्न केलं तेव्हा तो ३२ वर्षांचा होता. त्याची पत्नी सफा ही त्यावेळी २२ वर्षांचा आहे.

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली त्याच्यापेक्षा सहा वर्षांपेक्षा वयाने मोठी आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅग्रा हा बायकोपेक्षा १२ वर्षांनी मोठा आहे.