T20 World Cup PAK vs AUS: हसन अलीला ट्रोल करण्यावरून पाकिस्तानी फॅन्सवर हरभजनचा संताप; म्हणाला, "कुटुंबावर..."

T20 World Cup PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्याचं खापर पाकिस्तानचे चाहते हे हसन अलीवर फोडत आहे. बाबर आझमनंदेखील त्याच्या हातून कॅच सुटला नसता तर निकाल वेगळा असता असं वक्तव्य केलं होतं.

T20 World Cup PAK vs AUS: पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात पहिलाच पराभव पत्करावा लागला. परंतु पहिल्याच पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, आता पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांनी याचं खापर हसन अलीवर फोडण्यास सुरू केलं आहे.

सामन्यानंतर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानंदेखील त्याचा कॅच सुटला नसता तर कदाचित निकाल वेगळा असता असं वक्तव्य केलं होतं. परंतु आता सोशल मीडियावर (Social Media) हसन अली आणि त्याच्या कुटुंबीयांना मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्याबाबत ट्रोल केलं जात आहे.

अनेकांकडून हसन अलीवर टीका होत असली तर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. तसंच तणाव असताना अनेकदा असे कॅच सुटत असतात असं वक्तव्यदेखील त्यानं केलं आहे.

"प्रत्येक कॅच हा कठीणच असतो. प्रेशर असलेल्या मॅचमध्ये अनेकदा कॅच सुटतात आणि अनेकदा जबदस्त कॅचेस पकडलेही जातात. माझं म्हणणं हेच आहे की हसन अली कोणत्या देशाशी निगडीत आहे ते विसरून जायला हवं, तो एक खेळाडू आणि त्यानं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला," असंही हरभजन म्हणाला.

"पराभवानंतर त्याच्या कुटुंबीयांना लक्ष्य करणं चुकीचं आहे. तो पण एक माणूस आहे आणि चूक ही माणसाकडूनच होते. एका खेळाडूला लक्ष्य करणं चुकीचं आहे. याशिवाय अनेका चुका झाल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे," असं हरभजननं स्पष्ट केलं. त्यानं आपल्या युट्यूब चॅनलवरून बोलताना यावर भाष्य केलं.

दरम्यान १९ व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीकडून मॅथ्यू वेडचा कॅच सुटला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला १० चेंडूंमध्ये २० धावांची गर होती. हसन अली कडून मिळालेल्या जीवनदानाचा मॅथ्यू वेडनं फायदा घेतला आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या पुढील तीन चेंडूंवर तीन छक्के ठोकले.

मॅथ्यू वेडच्या या जबरस्त खेळीनंतर ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला आणि त्यांचं अंतिम सामन्याचं तिकिट पक्क झालं. कॅच सुटल्यानंतर हसन अली खुप भावूकही दिसला होता. आता ऑस्ट्रिलिया विरुद्ध न्यूझीलंड हा सामना रविवारी पार पडणार आहे.

दोन्ही गटांतून दुसऱ्या क्रमांकावरून उपांत्य फेरीत आलेल्या संघांनी Super 12 मधील स्टार संघाना स्पर्धेबाहेर फेकले. स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ ठरलेल्या पाकिस्तानची घोडदौड उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं रोखली आणि तिही नाट्यमय अंदाजात.

मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड यांनी चार षटकांत जो काही हंगामा केला, त्याचे दणके पुढील अनेक वर्ष पाकिस्तानला टोचत राहतील. १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीकडून सुटलेला झेल हा पाकिस्तानसाठी टर्निंग पॉइंट ठरला असता. १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीकडून सुटलेला झेल हा पाकिस्तानसाठी टर्निंग पॉइंट ठरला असता.

"मॅथ्यू वेडचा कॅच सुटणं हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. जर त्याचा कॅच घेतला असता तर मैदानावर नवा बॅट्समन आला असता. अशावेळी वेगळी परिस्थिती असती, कदाचित सामन्याचा निकालही वेगळा असता," असं बाबर आझम म्हणाला. "ज्या प्रकारे आम्ही खेळ सुरू केला तो आम्ही ठरवल्याप्रमाणेत च होता. आम्ही चांगला स्कोअरही केला. आमची गोलंदाजी आज तितकी चांगली झाली नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही कॅच सोडाल तर निकाल असाच बदलेल आणि तोच टर्निंग पॉईंटही होता," असं बाबर आझम म्हणाला होता.

"आम्ही ज्या पद्धतीनं संपूर्ण स्पर्धेत खेळलो तो खेळ वाखाणण्याजोगा होता. आम्ही येणाऱ्या दिवसांत आणखी चांगलं करण्याचे प्रयत्न करून. प्रत्येक खेळाडूला जो रोल देण्यात आला होता, तो त्यानं योग्यरित्या पार पाडला. ज्या प्रकारे लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं तेदेखील उत्तम होतं. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो," असंही आझमनं सांगितलं.

२०२१ मध्ये डावखुऱ्या मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीनं पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तर यापूर्वी २०१० मध्ये विश्वचषक सामन्यामध्ये मायकेल हसीनं २४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी करत पाकिस्तानला धुळ चारली होती. तर यावेळी मॅथ्यू वेडनं १७ चेंडूंमध्ये ४१ धावा करत पाकिस्तानला थेट घरचाच रस्ता दाखवला. मॅथ्यू वेडच्या खेळीनं २०१० मधल्या मायकेल हसीच्या खेळीची आठवण आणून दिली.