T20 World Cup, IND vs NZ Live Update : भारत-न्यूझीलंड लढतीला का आहे उपांत्यपूर्व फेरीइतकं महत्त्व?; भारत जिंकल्यास किंवा हरल्यास कसे असेल समिकरण?

T20 World Cup, India vs New Zealand Live Update : पाकिस्तानकडून पराभवाचा मार खाणारे दोन संघ भारत आणि न्यूझीलंड रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जीव ओतून खेळतील यात शंका नाही आणि क्रिकेट चाहत्यांना आणखी एक संडे ब्लॉकबस्टर पाहायला मिळेल.

T20 World Cup, India vs New Zealand Live Update : पाकिस्तानकडून पराभवाचा मार खाणारे दोन संघ भारत आणि न्यूझीलंड रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जीव ओतून खेळतील यात शंका नाही आणि क्रिकेट चाहत्यांना आणखी एक संडे ब्लॉकबस्टर पाहायला मिळेल. पण, हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यातील पराभूत संघाला जर तर च्या शक्यतेवर पुढील प्रवास करावा लागणार आहे. India vs New Zealand T20 World Cup 2021 match day.

ग्रुप २ मध्ये पाकिस्तान सलग तीन विजय मिळवून ६ गुण व ०.६३८ अशा तगड्या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. आता उर्वरित दोन सामन्यांत त्यांच्यासमोर नामिबिया व स्कॉटलंड हे लिंबू टिंबू संघ आहेत आणि त्यांना सहज पराभूत करून उपांत्य फेरीची औपचारिकता पाकिस्तान पूर्ण करेल.

आता या गटातून Semi Final च्या दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान, न्यूझीलंड व भारत असे तीन स्पर्धक शर्यतीत आहे. सध्या अफगाणिस्तान व नामिबिया प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच Super 12 मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या नामिबियाचा पुढील प्रवास सोपा नक्की नसेल, त्यांच्यासमोर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्ता व न्यूझीलंड हे तगडे स्पर्धक आहेत.

अफगाणिस्तान ३.०९२ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्यांनी उर्वरित तीन सामन्यांत भारत किंवा न्यूझीलंड यापैकी एकाही बलाढ्य संघाला पराभूत केल्यास ग्रुप २मधील चुरस आणखी तीव्र होऊ शकते. रविवारी ते नामिबियावर विजय मिळवून चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम राहतील, असे गृहीत धरायला हरकत नाही.

भारत-न्यूझीलंड यांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसराच सामना आहे आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. अशात जिंकणारा संघ उपांत्य फेरीच्या दिशेनं पाऊल टाकेल हे निश्चित आहे. त्यामुळे जर टीम इंडिया जिंकली, तर त्यांना उर्वरित तीन लढतीत अफगाणिस्तान, नामिबिया व स्कॉटलंड या तुलनेलं दुबळ्या संघाचा सामना करायचा आहे. हे तीनही सामने तसे जिंकणे भारताला कठिण नाही. पण, अफगाणिस्तान कडवी टक्कर देऊ शकतात.

भारत जर आजचा सामना पराभूत झाला, तर मात्र सारे अवघड होऊन बसेल. मग भारताला जवळचा मित्र अफगाणिस्तान मदल करू शकतो. अफगाणिस्ताननं ७ नोव्हेंबरच्या लढतीत न्यूझीलंडवर विजय मिळवावा अशी प्रार्थना टीम इंडियाला करावी लागेल. तसे झाल्यास भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी ( जर काही धक्कादायक निकाल लागले नाही तर) ६ गुण होतील आणि नेट रन रेटवर दुसरा संघ ठरेल.