Sunil Gavaskar Shimron Hetmyer IPL 2022 : सुनील गावस्कर हे काय बोलून बसले?; शिमरोन हेटमायरच्या पत्नीचा उल्लेख केला अन्...

Sunil Gavaskar Shimron Hetmyer IPL 2022 : आयपीएल २०२० मध्ये सुनील गावस्कर यांनी विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्याबाबत एक कमेंट केली होती आणि ती वादात अडकली होती. आज गावस्करांनी शिमरोन हेटमायर बद्दल एक कमेंट केली आणि त्यात त्यांनी त्याच्या पत्नीचा उल्लेख केला...

Sunil Gavaskar Shimron Hetmyer IPL 2022 : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक अन् आर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals ) शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings ) विजय मिळवला. CSK चे १५१ धावांचे लक्ष्य RR ने १९.४ षटकांत ५ बाद १५१ धावा करून पार केले.

या विजयासह राजस्थानने क्वालिफायर १ मधील स्थान पक्के केले आणि २४ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध कोलकाता येथे ते खेळणार आहेत. या सामन्या दरम्यान भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) हे समालोचन करत होते आणि शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) फलंदाजी करताना त्यांच्याकडून अनपेक्षित विधान झालं...

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ६ बाद १५० धावा केल्या. यापैकी ९३ धावा या मोईन अलीच्याच होत्या, तर उर्वरित फलंदाजांनी ६३ चेंडूंत ५२ धावा केल्या आणि ५ धावा Wide मधून आल्या. अली व डेवॉन कॉवने ( १६) यांनी ३९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी केली.

दोन जीवदान मिळालेल्या महेंद्रसिंग धोनी ( २६) व अलीने ५२ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. अली ५७ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९३ धावांवर बाद झाला. चेन्नईला ६ बाद १५० धावाच करता आल्या. चहल व मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ४ षटकांत २८ धावा देताना १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरात, जोस बटलर ( २) पुन्हा अपयशी ठरला, परंतु यशस्वी जैस्वालने संजू सॅमसनसह ४१ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. ९व्या षटकात मिचेल सँटनरने ही जोडी तोडली. संजूला ( १५) त्याने रिटर्न कॅच घेत बाद केले. मोईन अलीने १२व्या षटकात देवदत्त पडिक्कलचा ( ३) त्रिफळा उडवला.

यशस्वी ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५९ धावा करून बाद झाला. शिमरोन हेटमायर ६ धावाच करू शकला. अश्विन २३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने १९.४ षटकांत ५ बाद १५१ धावा केल्या.

आयपीएल २०२० दरम्यान गावस्करांनी अशीच एक कमेंट वादात अडकली होती. RCB विरुद्ध PBKS या सामन्यात गावस्कर म्हणाले होते की,''विराटनं लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला.'' लॉकडाऊनमध्ये विराट-अनुष्काचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ देऊन गावस्कर यांनी हे विधान केलं असाव, परंतु त्यांच्या या विधानानं चाहते चांगलेच भडकले आहेत. गावस्करांच्या या विधानाचा अनेकांनी दुहेरी अर्थही लावला.