Love Story : पत्नीला छेडणाऱ्या रोमिओला शकिब अल हसन हाणतो, तेव्हा...

बांगलादेशचा सर्वात यशस्वी खेळाडू शकिब अल हसन सध्या चर्चेत आहे, ते नकोशा कारणानं. मॅच फिक्सिंगसाठी बुकीनं संपर्क साधल्याची माहिती शकिबनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) दिली नाही. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली.

शकिबची ही बंदी 29 ऑक्टोबर 2020मध्ये संपुष्टात येणार आहे. पण, त्याला पुढील वर्षी इंडियन प्रीमिअर लीग आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागणार आहे.

32 वर्षीय शकिब हा जागतिक क्रमवारीत कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे तिसऱ्या, पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे.

शकिबवरील कारवाईनंतर त्याच्या पत्नीनं भावनिक पोस्ट केली. शिशीर असं तिचं नाव आहे. तिनं लिहिले की,''एका रात्री दिग्गज तयार होत नाही. त्यांना अनेक वादळांचा सामना करावा लागतो. त्यामुळे असे अनेक चढउतारांचे प्रसंग आयुष्यात येतात. पण, दिग्गज खेळाडू त्यामुळे खचत नाहीत. शकिब दमदार कमबॅक करेल. त्याची नवी इनिंग आधीपेक्षा दमदार असेल.''

शकिब आणि शिशीर यांची लंडनमध्ये 2010साली कौंटी क्रिकेट स्पर्धेदरम्यान भेट झाली. कौंटी क्रिकेटमध्ये खेळणारा शकिब हा पहिला बांगलादेशी खेळाडू आहे. शिशीर ही लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. भेटीनंतर दोघ एकमेकांना आवडू लागले.

दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शकिब व शिशीर यांनी 2012मध्ये लग्न केलं. तीन वर्षानंतर या जोडीला कन्यारत्न प्राप्ती झाली.

2014च्या भारताविरुद्धचा मिरपूर वन डे सामन्यादरम्यान शिशीरची छेडछाड करणाऱ्या इसमाला शकिबनं चोपले होते.