Shahid Afridi: शाहिद आफ्रिदी फोनवर तरुणीच्या प्रेमात पडला, 'गंमतीसाठी' घरी बोलावले; आता पस्तावतोय...

आफ्रिदीने सांगितलेला किस्सा हास्यास्पद देखील आहे. या घटनेत आफ्रिदीचा प्रेमभंग झाला होता.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात काही खुलासे केले आहेत. त्याच्या पुस्तकाचे नाव गेम चेंजर जरी असले तरी एकदा त्याचाच गेम होता होता राहिला होता. याचा किस्सा आफ्रिदीने या पुस्तकात सांगितला आहे.

आफ्रिदीने क्रिकेटसह गौतम गंभीर आणि पाकिस्तान क्रिकेटवरचे किस्से या पुस्तकात लिहिले आहेत. काही माजी क्रिकेटरांवर गंभीर आरोपही केले आहेत. याचबरोबर आफ्रिदीने त्याला लाजीरवाणी वाटणारी घटनादेखील सांगितली आहे.

आफ्रिदीने सांगितलेला किस्सा हास्यास्पद देखील आहे. या घटनेत आफ्रिदीचा प्रेमभंग झाला होता. आफ्रिदीच्या मागे आताही अनेक महिला, मुली लागतात. हा किस्सा तर त्याच्या लग्नापूर्वीचा आहे. हा किस्सा ९० च्या दशकातील आहे.

तेव्हा आफ्रिदी खूप पार्ट्या करायचा. ज्या देशाचा दौरा असायचा त्या देशातील पब, बार त्याने पालथे घातले आहेत. तो एकदा ऑस्ट्रेलियातील एका क्लबमध्ये रात्रभर एका मुलीसोबत होता. परंतू, त्याच्या या अय्याशीच्या काळात अशी घटना घडली की त्यालाच लाज वाटली.

“एक मुलगी लग्नाआधी मला अनेकदा फोन करायची. तिचा आवाज गोड होता. मोबाईल फोन तेव्हा नवीन होते आणि तेव्हा खूप महागही होते. त्या मुलीचा आवाज ऐकण्यासाठी मी खूप पैसे खर्च केले.'', असे आफ्रिदी म्हणाला.

महिनों महिने फोनवर बोलल्यानंतर आम्ही दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. परंतू जेव्हा भेटलो तेव्हा हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. ज्या मुलीशी मी तासंतास बोलायचो ती मुलगी नव्हतीच, असे तो म्हणाला.

तिला घरी बोलावलेले. बेल वाजली दरवाजा उघडला तर एक तरुण गुलाब घेऊन उभा होता. मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. त्याने सांगितले की ती तीच मुलगी आहे ज्याच्याशी मी इतके महिने बोलत होतो. तेव्हा मला खूप लाजिरवाणे वाटले, असे शाहिद म्हणाला.