भारताने ऑस्ट्रेलियावर कसा मिळवला विजय, पाहा फक्त एका क्लिकवर...

भारताचा सलामीवीर शिखर धवनने या सामन्यात भारताचा विजयासाठी चांगला पाया बनवून दिला.

धवनने या सामन्यात ९६ धावांची दणदणीत खेळी साकारली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतकी खेळी साकारत धवनला चांगली साथ दिली.

लोकेश राहुलने कोहलीनंतर भारताचा डाव सावरला. राहुलनेही अर्धशतकी खेळी साकारली.

धवन, कोहली आणि राहुल यांच्या खेळींच्या जोरावर भारताला ३४० धावा उभारता आल्या.

गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या डेव्हिड वॉर्नरचा अप्रतिम झेल मनीष पांडेने यावेळी टिपला.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल चांगलेच उंचावले गेले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला राहुलने यावेळी अप्रतिमपणे यष्टीचीत केले आणि त्यांना मोठा धक्का दिला.

रवींद्र जडेजानेही भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला वेसण घालण्याचे काम केले.

भारताचा कुलदीप यादवने या सामन्यात शंबर बळींचा टप्पा पूर्ण केला.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात सर्वाधिक तीन बळी मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला.