सामना वाचवला, मालिका गमावली

मेलबर्नवर तिस-या कसोटीच्या पहिल्या डावात शतक व दुस-या डावात अर्धशतक झळकावणा-या विराट कोहली व पहिल्या डावात शतकी खेळी केलेल्या अजिंक्य रहाणेमुळे भारताला तिसरा सामना अनिर्णित राखता आला. अर्थात भारताने गावस्कर - बॉर्डर ही चार सामन्यांची मालिका २ - ० अशी गमावली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ५३० धावांचा पाठलाग करताना तिस-या कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने शानदार शतक ठोकताना २३९ चेंडूंमध्ये १४७ धावा केल्या आणि भारताला ४६५ धावांनी प्रत्युत्तर देण्यात मोलाची भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात १९२ धावा केल्या ज्या बळावर कांगारूंनी ५३० धावांचा डोंगर उभा केला.

विराट कोहलीला बाद केल्यानंतर खूश झालेला रयान हॅरीस. कोहलीने तीन कसोटी सामन्यात ४९९ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियात एका दौ-यात सर्वाधिक धावा करणारा विदेशी खेळाडू असा मान त्याने पटकावला आहे.

दुस-या डावात ९९ वर बाद झालेल्या शॉन मार्शचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. परंतु मार्शने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.

जो बर्न्सला बाद केल्यानंतर ईशांत शर्माचे अभिनंदन करताना भारतीय खेळाडू.

ख्रिस रॉजर्सला बाद केल्यानंतर आर. अश्विनचे अभिनंदन करताना भारतीय कर्णधार महेंद्र सिंग ढोणी.

ब्रॅड हॅडिनला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना उमेश यादव. यादवनेही पहिल्या डावात तीन तर दुस-या डावात दोन गडी टिपले.

ऑस्ट्रेलियन व भारतीय खेळाडुंच्या शाब्दिक चकमकी हे देखील या दौ-याचे वैशिष्ट्य ठरले. अंपायर कुमार धर्मसेना ऑस्ट्रेलियन कप्तान स्टीव्ह स्मिथला सबुरीचा सल्ला देताना.

चेतेश्वर पुजाराला बाद केल्यावर आनंद व्यक्त करताना मिचेल जॉन्सन. जॉन्सनने पहिल्या डावात तीन तर दुस-या डावात दोन गडी बाद करत भारतीय फलंदाजांना रोखले.