सचिन तेंडुलकरचा बंगला आतून कसा दिसतो माहित्येय? पाहा Photo

महान फलंदाज सचिन तेंडुलकर त्याच्या कुटुंबीयांसह वांद्रे पश्चिम य़ेथील आलिशान बंगल्यात राहतो.

2007मध्ये त्यानं 35 कोटींमध्ये 'Dorab Villa' खरेदी केला. 1920मघ्ये पारसी कुटुंबीयांनी हा विला बांधला होता.

त्यानंतर सचिननं त्या जागी स्वतःचा बंगला उभा केला. सचिनच्या स्वप्नातला बंगला प्रत्यक्षात उतरण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला.

वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोड येथे 10 हजार स्क्वेअर फुटांचा हा बंगला आहे.

शंखाच्या आकाराचं एक घरही या बंगल्याच्या परिसरात तयार करण्यात आले आहे.

या बंगल्यासाठी सचिननं 100 कोटींचं इंश्युरन्स काढले आहे.

2001मध्ये सचिन त्याच्या कुटुंबीयांसह वांद्रे पश्चिमेकडील ला मेर येथील अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. त्यानंतर 2011मध्ये त्यानं नवीन घरी प्रवेश केला.