१९८८ मध्ये मी पहिल्यांदा लॉर्ड्सला भेट दिली आणि १९८९ मध्ये स्टार क्रिकेट क्लब संघातून खेळलो. मला आजही आठवतंय की, त्यावेळी मी पॅव्हेलियनजवळ उभा राहून इतिहासात रमलो होतो. आज, याच ठिकाणी माझे पोर्ट्रेट अनावरण झाले. या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, अशी भावूक पोस्टही सचिन तेंडुलरनं शेअर केली आहे.