Rohit Sharma Reaction on Mumbai Indians, IPL 2022 MI vs LSG: "मला ते जमत नाहीये हे कळतंय पण..."; मुंबईच्या पराभवानंतर रोहितची कबुली

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग सहा सामन्यात झाला पराभव

1.Rohit Sharma Reaction on Mumbai Indians, IPL 2022 MI vs LSG: मुंबई इंडियन्सचा शनिवारी लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) १८ धावांनी मोठा पराभव केला. मुंबईने लाजिरवाणी कामगिरी सुरू ठेवत हंगामात पराभवाचा षटकार लगावला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.

2."आजच्या पराभवात नक्की काय चुकलं हे सांगताना एखादी गोष्ट सांगणं कठीण आहे. जेव्हा तुमच्यापुढे आव्हान मोठे असते तेव्हा छोट्या मोठ्या भागीदारी होणे खूप आवश्यक असते. त्यात आम्ही पुरते नापास झालो."

3."पराभव का झाला याला एक विशिष्ट कारण देणे कठीण आहे. आम्ही सारे जण स्वत:पेक्षा संघाला जास्त महत्त्व देत आहोत. पण आजच्या सामन्यात लखनौने सुंदर फलंदाजी केली. त्यावेळी आमच्या गोलंदाजांना भेदक मारा करणं जमलं नाही."

4."आम्ही प्लॅननुसार जसप्रीत बुमराहला शेवटच्या ओव्हर्ससाठी राखून ठेवतो, त्याप्रमाणे आजही केले. पण त्याचा म्हणावा तसा आम्हाला फायदा झाल्याचे दिसले नाही. त्याने उत्तम गोलंदाजी केली, पण त्याला इतरांनी साथ द्यायलाच हवी. प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा खेळासाठी मैदानात उतरत असतो तेव्हा आम्ही विचार करून त्या पिचला योग्य वाटणारे सर्वोत्तम ११ खेळाडू घेऊन खेळतो."

5."आता आम्ही ६ सामने हरलो आहोत, पण आम्ही अजूनही योग्य टीम काय असावी, याच्याच शोधात आहोत. कदाचित पिचचा विचार करत असताना समोरचा संघ कोणता आहे, त्याचाही अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही अभ्यास करायला हवा."

6."तुम्ही जेव्हा सातत्याने पराभूत होता त्यावेळी संघातील बदलांकडे बोट दाखवलं जातं. पण आम्ही दर वेळी सर्वोत्तम ११ खेळाडूंनाच संधी देतो. पण आज लोकेश राहुलने खूपच अप्रतिम फलंदाजी केली. तशी खेळी आमच्या संघात कित्येक दिवस होत नाहीये ही आमची समस्या आहे."

7."आम्ही आताच्या हंगामात अद्याप एकही सामना जिंकू शकलेला नाही, तरीही आम्हाला मान खाली घालण्याची गरज नाही. मी स्वत:ला प्रत्येक सामन्यासाठी सज्ज करण्याच्या प्रक्रियेत आहे."

8."मला माझी चूक कबुल आहे. माझ्या संघाच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची माझ्याकडून पूर्तता होत नाहीये हे मला माहिती आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. मी इतकी वर्षे संघासाठी जसा खेळत होते, त्याच लयीत मला लवकरच परतायचे आहे. त्यासाठी मी पुढील सामन्यांकडे लक्ष देणार आहे."

9."आयुष्यात जे घडून गेलं ते सोडून पुढचा विचार करायचा असतो. कारण आताची परिस्थिती हा काही जगाचा अंत नाही. आम्ही याआधीही दमदार पुनरागमन केले आहे. आणि यावेळीही आम्ही शानदार कमबॅक करण्यासाठी अथक प्रयत्न करू", असे रोहित म्हणाला.