रोहित शर्मानं दिली Good News; मोठ्या आनंदात केलं नव्या पाहुण्याचं स्वागत

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण असताना टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मानं गुरुवारी सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली.

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यानं सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत आहे.

त्यात रोहितनं मुलगी समायरा सोबत क्रिकेट, ल्युडो आदी खेळ खेळतानाचे व्हिडीओ पोस्ट करून हा काळ कसा कुटुंबीयांसोबत घालवत असल्याचे सांगितले.

कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना रोहितनं सामाजिक जबाबदारीही पार पाडली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी त्यानं केंद्र आणि राज्य सरकारला मिळून 80 लाखांची मदत केली आहे.

रोहितन याशिवाय Welfare of Street Dogs आणि Feeding India या संस्थांनाही प्रत्येकी 5 लाखांची मदत केली आहे.

याच सोबत रोहित World Wide Fund for Nature in India या संस्थेचा सदिच्छादूतही आहे. ही संस्था गेंड्याच्या प्रजातीचं रक्षण आणि संवर्धन करण्याचं काम करते.

2018मध्ये रोहितची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी त्यानं इंग्लंडिवरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये झळकावलेलं शतक सुदान ( अखेरचा पांढरा गेंडा) याला समर्पित केले होते.

गेंड्याच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या WWF India सोबत रोहित समाजकार्य करत आहे.

याच संस्थेशी निगडीत गोड बातमी रोहितनं गुरुवारी शेअर केली.

आसामच्या मनास राष्ट्रीय उद्यानात गेंड्याच्या कुटुंबात नवीन सदस्याची बातमी रोहितनं दिली.