WTC Final मध्ये रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या वाटेवर, बनणार नंबर-1 भारतीय!

Rohit Sharma, WTC Final 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनलचा सामना बुधवारपासून होणार सुरू

Rohit Sharma Record, WTC Final IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघेही आपल्या पहिल्या कसोटी विश्वविजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू ओव्हलवर पोहोचले असून या मोठ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

या सामन्यात कर्णधार रोहितला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. रोहित एका बलाढ्य विक्रमापासून फक्त दोन पावले दूर आहे. हा विक्रम त्याने केल्यास तो नंबर १ भारतीय खेळाडू बनेल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्यात रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत लगेच अव्वल येणे त्याला सध्या तरी कठीण आहे. पण भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याला अव्वल येणं शक्य आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने 59 षटकार मारले आहेत. पण रोहितच्या नावावर 37 षटकारच आहेत.

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तो दुखापतग्रस्त असल्याने संघाचा भाग नाही. त्याच्या नावावर 38 षटकार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित 2 षटकार मारण्यात यशस्वी ठरला, तर तो WTC मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा नंबर १ भारतीय ठरेल.