रोहित, विराट च्या ट्वेन्टी कारकीर्दीचा द एन्ड; 3 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिकेला तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे.

यात अनेक खेळाडू बाहेर आहेत, तर काही वेगळे चेहरे संघात पाहायला मिळाले आहेत.

पहिला एक दिवसीय सामना १८ जानेवारीला न्यजझिलंड विरुद्ध होत आहे. या सामन्यासाठी केएस राहुलची न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या ODI मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे, KL राहुल कौटुंबिक कारणामुळे सुट्टीवर आहे.

अक्षर पटेलच्या जागी शाहबाज अहमदची निवड करण्यात आली आहे. कौटुंबिक कारणांमुळेही तोही उपलब्ध नाहीत. शार्दुल ठाकूरलाही संघात स्थान दिलेले आहे.

संजू सॅमसनचे नाव टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात नाही. मुंबईतील T20I सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली. कदाचित त्यामुळेच त्याला संघात स्थान दिलेले नाही. त्याच्या जागी जितेश शर्माची निवड करण्यात आली आहे.

इशान किशन याची बॅकअप यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. रिषभ पंतचा अपघात झाल्यामुळे तो सध्या उपचार घेत आहे. त्याच्या जागी केएस भरतला संधी मिळणार आहे.

पृथ्वी शॉचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्या पुन्हा संघाचा कर्णधार तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांची निवड करण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलेले नाही. जसप्रीत अजूनही फिट नाही. रवींद्र जडेजा कसोटी संघात आहे, पण त्यालाही फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. केएल राहुलला पुन्हा या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे हे दोघे क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये क्वचितच दिसणार असल्याचे संकेत बोर्डाने दिले आहेत.