WTCसाठी महत्वाची असणाऱ्या AUSविरुद्धच्या मालिकेत पंत मुकणार; 'या' ३ यष्टीरक्षकांमध्ये स्पर्धा

Rishabh Pant: डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अपडेटनुसार ऋषभ पंत २ ते ६ महिन्यांत बरा होऊ शकतो.

कार अपघातात जखमी झालेला भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतच्या दुखापतीत बरीच सुधारणा झाली आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) दिल्लीचे अधिकारीही शनिवारी मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी पंतची भेट घेतल्यानंतर सांगितले की, पाच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पंतवर उपचार करत आहे.

ऋषभ पंतला क्रिकेटच्या मैदानावर परतायला बराच वेळ लागू शकतो, अशा परिस्थितीत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या खेळण्यावर संकट निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणाला संधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या शर्यतीत तीन नावे आघाडीवर आहेत, त्यात केएस भरत, उपेंद्र यादव आणि इशान किशन या नावांचा समावेश आहे.

दिल्लीहून रुरकीला जात असताना ऋषभ पंतचा कारचा भीषण अपघात झाला, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अपडेटनुसार ऋषभ पंत २ ते ६ महिन्यांत बरा होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक पदासाठी तीन खेळाडूंमध्ये शर्यत आहे, ज्यामध्ये केएस भरत आघाडीवर आहे. गेल्या काही मालिकांमध्ये केएस भरत टीम इंडियाच्या संघात दुसरा यष्टिरक्षक म्हणून सामील झाला आहे. मात्र, त्याचे पदार्पण अजून व्हायचे आहे आणि अशा परिस्थितीत तो आता ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो.

केएस भरत व्यतिरिक्त इंडिया-Aचा यष्टिरक्षक उपेंद्र यादवलाही संधी मिळू शकते. सोबतच टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनही या शर्यतीत आहे. संजू सॅमसन किंवा इशान किशन यांनी आपापल्या राज्यांसाठी रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतलेला नाही. असे मानले जाते की केवळ केएस भरतच नागपूर कसोटीत पदार्पण करू शकतो.

९-१३ फेब्रुवारी, पहिली कसोटी (नागपूर)/ १७-२१ फेब्रुवारी, दुसरी कसोटी (दिल्ली)/ १-५ मार्च, तिसरी कसोटी (धर्मशाला)/ ९-१३ मार्च, चौथी कसोटी (अहमदाबाद)