रिषभ पंतचीही फिल्मी स्टाईल अदाकारी; प्रेयसीसोबत रोमँटिक सफर

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघातील बऱ्याच सदस्यांनी कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य दिलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत स्वित्झर्लंडला फिरायला गेला होता, तर हार्दिक पांड्या गर्ल्डफ्रेंड नताशा स्टँकोव्हिचसोबत दुबईला गेला होता.

हार्दिकने तर 2020च्या पहिल्याच दिवशी नताशासोबत साखरपुडा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

आता संघातील वरिष्ठ खेळाडू भ्रमंतीला गेले असताना यष्टिरक्षक रिषभ पंत कशाला मागे राहिल.

तोही त्याच्या प्रेयसीसोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला होता.

रिषभनं गुरुवारी त्याचे आणि प्रेयसी इशा नेगीचे फिल्मी स्टाईल फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

त्यावर त्यानं असं लिहिले की,''जेव्हा तू माझ्यासोबत असतेस तेव्हाच मला मी आवडतो.''

इशानेही त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देताना... प्रेमाला पाच वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला.

इशा इंटेरियर डेकर डिझायनर आहे. डेहराडूनच्या उद्योगपती घराण्यातील ती मुलगी आहे.

टीम इंडियातील रिषभ पंतची कामगिरी साजेशी होत नाही. अशात निवड समितीनंही त्याला धोक्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचे दडपण त्याच्यावर असणार आहे.