PICS : RCB च्या खेळाडूंनी विराटच्या रेस्टॉरंटला दिली भेट; कोहली, मॅक्सवेलसह कर्णधाराचीही हजेरी

Virat Kohli one8 commune Restaurant : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल २०२३ मधील आपला दुसरा सामना गुरूवारी कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल २०२३ मधील आपला दुसरा सामना गुरूवारी कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. हा सामना कोलकाता त्यांच्या घरच्या मैदानावर अर्थात ईडन गार्डन्सवर खेळेल.

केकेआरविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या खेळाडूंनी विराट कोहलीच्या वन 8 कम्यून रेस्टॉरंटला भेट दिली.

विराट कोहलीसह ग्लेन मॅक्सवेल, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद सिराज यांनी रेस्टॉरंटला भेट दिली.

विराट कोहलीच्या वन 8 कम्यून रेस्टॉरंटमध्ये जवळपास १०० लोक बसण्याची क्षमता आहे. याला सुप्रसिद्ध डिझायनर सुमेश मेनन यांनी तयार केले आहे.

किंग कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये आरसीबीचे खेळाडू जेवण करताना दिसले, ज्याचे काही फोटो समोर आले आहेत.

आरसीबीचा माजी कर्णधार आणि सलामीवीर विराट कोहलीने आपल्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्ध ४९ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली होती. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकून मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

अलीकडेच आरसीबीचा माजी खेळाडू मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सने पत्नीसह विराट कोहलीच्या रेस्टॉरंटला भेट दिली होती.

विराटने आयपीएल २०२३ ची सुरूवात स्फोटक केली असून पहिल्याच सामन्यात याचा प्रत्यय पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

खरं तर आरसीबीचा संघ कागदावर जरी तगडा असला तरी त्यांना एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे यंदा फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का हे पाहण्याजोगे असेल.