ब्रेन्डन टेलरने १३८ धावा करत झिम्बाब्वेला चांगली धावसंख्या उभारून दिली. झिंम्बाब्वेने ५० षटकांमध्ये २८७ धावा केल्या. परंतु चांगल्या बॅट्समनचा भरणा असलेल्या भारताने ही धावसंख्या ८ चेंडू राखत पार केली.अजिंक्य रहाणेला धावबाद केल्यानंतर आनंद साजरा करताना ब्रेन्डन टेलर.३८ धावांवर बाद झाल्यामुळे निराश झालेला विराट कोहली.हॅमिल्टन मस्कझाने सुरेश रैनाचा एक झेल सोडला जो झिम्बाब्वेला चांगलाच महागात पडला.विजयी फटका लगावताना कप्तान महेंद्र सिंग ढोणी. ढोणी व रैनाने पडझड झालेला भारताचा डाव सावरला आणि भारताला लक्ष्य गाठून दिले.सुरेश रैनाच्या शतकाचा भारताच्या विजयात मोलाचा वाटा होता. रैनाने १०४ चेंडूंमध्ये ११० धावा केल्या.विजयाचा धडाका लावलेल्या भारताने वर्लडकपमधल्या साखळी सामन्यातला शेवटचा म्हणजे सहावा सामनाही झिम्बाब्वेला नमवत सहा गडी राखून जिंकला. १२ गुणांसह भारत ब गटात आघाडीवर असून उपउपांत्य फेरीत भारताची गाठ १९ मार्च रोजी बांग्लादेशशी आहे.