Photo : पंजाब किंग्सच्या फलंदाजानं बालपणीच्या मैत्रीणीसोबत बांधली लग्नगाठ; म्हणाला, आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही!

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran) हा लग्नबंधनात अडकला. त्यानं १ जूनला सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्टकरून ही आनंदाची बातमी दिली.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निकोलसनं बालपणीची मैत्रीन अॅलिसा मिग्युएल ( Alyssa Miguel) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी नोव्हेंबर २०२०त आयपीएल संपल्यानंतर साखरपुडा केला होता.

पूरननं लग्नाचा फोटो पोस्ट करून लिहिलं की, जीजसनं मला आयुष्यात सर्व काही दिलं, परंतु तुझं महत्त्व त्यासर्वांपेक्षा अधिक आहे. मिस्टर व मिसेस पूरन यांचे स्वागत करा.

आयपीएलदरम्यान अनेकदा मिग्युएल स्टेडियमवर दिसली आहे. दोघही बालपणीचे मित्र आहेत आणि सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या निकोलससाठी आयपीएल २०२१चा पहिला टप्पा काही खास गेला नाही. तो सात सामन्यांत चारवेळा भोपळाही फोडू शकल नाही.

आतापर्यंत आयपीएलमध्ये त्यानं २८ सामन्यांत ५४९ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यान २५ वन डे सामन्यांत ९८२ आणि २७ ट्वेंटी-२० सामन्यांत ३९२ धावा केल्या आहेत.