IPL 2022 Auction : नादच खुळा...!, काव्या मारनच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली अन् पठ्ठ्याने १५ हजार रुपयांची पिझ्झा पार्टी दिली

IPL 2022 Mega Auction मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) संघाच्या ऑक्शन टेबलवर दिसलेल्या काव्या मानरनने पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले.

IPL 2022 Mega Auction मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) संघाच्या ऑक्शन टेबलवर दिसलेल्या काव्या मानरनने पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर नेटिझन्सनी Kavya maranच्या नावाच ट्रेंड सुरू केला होता. त्यात काव्या मारनच्या संघातून IPL 2022 खेळण्याची संधी मिळालेल्या एका खेळाडूने चक्क १५ हजारांची पिझ्झा पार्टी दिली..

सनरायझर्स काव्या मारन मेगा ऑक्शनदरम्यान हैदराबादच्या टीमच्या स्टाफ आणि कोच यांच्यासोबत उपस्थित होते. काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची कन्या आहे. ती सध्या टीममध्ये रणनितीकार म्हणून काम पाहत आहे.

काव्या मारनचे वडिल कलानिधी मारन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं टीव्ही नेटवर्क सन टीव्हीचे मालक आहेत. काव्याची आई कावेरी मारनदेखील सनरायझर्स हैदराबादसोबत जोडल्या आहेत. त्या भारतात सर्वाधिक सॅलरी घेणाऱ्या बिझनेसवुमन्सपैकी एक आहेत.

काव्याचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. शिक्षणानंतर लगेच ती आपल्या वडिलांसोबत व्यवसायात उतरली नाही. तिनं सुरूवातीला सन टीव्हीमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर तिनं काम सांभाळलं आणि आता ती डिजिटल प्लॅटफॉर्म Sun NXT ची प्रमुखही आहे.

काव्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा २०१८ मध्ये दिसून आली होती. तिने चेन्नईमध्ये एमबीए केले होते. आता तिने आपले संपूर्ण लक्ष आयपीएलवर केंद्रित केले आहे.

सनरायजर्स हैदराबाद: केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर (८.७५ कोटी), निकोलस पुरन (१०.७५ कोटी), टी. नटराजन ( ४ कोटी), भुवनेश्वर कुमार ( ४.२० कोटी), प्रीयम गर्ग ( २० लाख), राहुल त्रिपाठी ( ८.५० कोटी), अभिषेक शर्मा ( ६.५० कोटी), कार्तिक त्यागी ( ४ कोटी), श्रेयस गोपाल ( ७५ लाख), जगदीश सुचिथ ( २० लाख), एडन मार्करम ( २.६० कोटी) , मार्को येनसेन ( ४.२० कोटी), रोमारियो शेफर्ड ( ७.७५ लाख), सीन अबॉट ( २.४० कोटी), आर समर्थ ( २० लाख), शशांक सिंग ( २० लाख), सौरभ दुबे ( २० लाख),

काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघानं अनपेक्षितपणे वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनवर बोली लावली. निकोलसला मागील पर्वात पंजाब किंग्सकडून ७.७२च्या सरासरीने ८५ धावाच करता आल्या होत्या. तरीही त्याच्यासाठी १०.७५ कोटींची बोली लागली.

सध्या वेस्ट इंडिजसंघासोबत भारत दौऱ्यावर असलेल्या निकोलसला ही बातमी समजताच त्याने सहकाऱ्यांना पार्टी दिली. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्यामुळेच बाहेरील खाद्य पदार्थालाही मनाही आहे. अशात निकोलसने हॉटेलमधील शेफलाच १५ पिझ्झाची ऑर्डर दिली, असे संघ व्यवस्थापकाने सांगितले. १५ पिझ्झा बॉक्स प्रत्येक खेळाडूच्या रुममध्ये पाठवण्यात आले आणि त्याचे पैसे पूरनने भरले.