न्यूझीलंडच्या खेळाडूंनी तर चक्क मैदानात खुर्च्या उचलून आणल्या, पण का...

टी-20 मालिकेत भारताने आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत.

या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पाऊस हा खलनायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात ७० टक्के पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सामन्यामध्ये कधीही पावसाची रिपरिप सुरु होऊ शकते. त्याचबरोबर या मैदानात जोरात वारे वाहू लागतात.

भारताने आतापर्यंत न्यूझीलंडचे बरेच दौरे केले आहेत. हे दौरे बऱ्याचदा भारतीय संघासाठी खडतर ठरलेले आहेत. त्यामुळेच गेल्या ५१ वर्षांमध्ये भारताला या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही.

भारताने या मैदानात १९६८ साली कसोटी मालिका सामना जिंकता आला होता. पण त्यानंतर गेल्या ५१ वर्षात भारतीय संघाला हे मैदान अनलकी ठरले आहे.

उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण या मैदानाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड फारच रोचक राहिलेला आहे.

या सामन्याचा सराव करताना न्यूझीलंडचा संघ मैदानात दाखल झाला. पण काही वेळातच न्यूझीलंडचे खेळाडू हातात खुर्च्या घेून मैदानात जाताना दिसले. पण नेमके असं घडले तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...

पहिल्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला एक फोटो काढायचा होता. या फोटोमध्ये काही खेळाडू खुर्चीवर बसणार होते. यासाठी त्यांनी मैदानात खुर्च्या उचलून आणल्या होत्या.