न्यूझीलंडने साधलेला व द.आफ्रिकेने गमावलेला... मोका

न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारल्यावर दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना मैदानावरच रडू कोसळले.

चोकर्स म्हणून ओळखल्या जाणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ दबावाखाली खेळण्यात अपयशी ठरला. कोरी अँडरसन व इलियटला बाद करण्याच्या तीन सुवर्ण संधी या संघाने क्षुल्लक चुका करत गमावल्या. या तीन चुका आफ्रिकेला चांगल्याच महागात पडल्या.

७३ चेंडूत ८४ धावांची खेळी करणा-या ग्रँट इलियटने ४२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडचा सलामीवीर व कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमने २६ चेंडूत ५९ धावांची धडाकेबाज खेळी करत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला. मॅक्यूलमनंतर गप्टिल केन विल्यिम्सन व रॉस टेलरही स्वस्तात बाद झाले. यानंतर कोरी अँडरसनने ग्रँट इलियटला मोलाची साथ देत न्यूझीलंडला विजयाच्या दिशेने नेले. कोरी अँडरसनने ५८ धावांची खेळी केली.

सामन्यातील सात षटकं ऐन वेळी कमी झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या डेव्हिड मिलरने तुफानी खेळी केली. मिलरने १८ चेंडूत ४९ धावा केल्या. तर डिव्हिलियर्स ६५ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेने ४३ षटकांत २८१ धावा केल्या.

३८ व्या षटकानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही वेळेसाठी थांबवण्यात आला. शेवटी हा सामना ४३ षटकांचा खेळवण्यात आला. खेळ पुन्हा सुरु होताच प्लेसिस ८२ धावांवर बाद झाला

प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी अपयशी ठरली. मात्र फाफ डू प्लेसिस व कर्णधार एबी डिव्हिलियर्स या जोडीने शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले. या दोघांनी ७३ चेंडूत १०३ धावांची भागीदारी केली.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वर्ल्डकपमध्ये मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने बाजी मारत फायनलचे तिकीट मिळवले. या रोमहर्षक सामन्याची ही क्षणचित्रे