ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!

Most Sixes in ODIs In Australia: ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पाच फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात, जे ऑस्ट्रेलियन नाहीत.

५) न्यूझीलंडचा माजी सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २९ षटकार मारून टॉप ५ मध्ये स्थान मिळवतो. त्याने एक परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

४) श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३ षटकार मारले आहेत आणि तो यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या षटकारांचा करिष्मा आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजा आहे.

३) ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३६ षटकार मारले आहेत.

२) 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३९ षटकार मारले आहेत.

१) भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम साधला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात एकूण ४४ षटकार मारले आहेत.