भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले पाकिस्तानी क्रिकेटपटू!

पाकिस्तान क्रिकेट संघातील मधल्या फळीचा फलंदाज उमर अकमलवर तीन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेची कारवाई झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या शिस्तपालन समितीचे प्रमुखे न्यायाधीश ( निवृत्त) फजल-ए- मिरान चौहान यांनी हा निर्णय सुनावला. पण, भ्रष्टाचार आणि त्याच्याशी संबंधित आरोपांत आतापर्यंत निलंबित झालेला उमर अकमल हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही.

सलीम मलिक ( 2000 ) - मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली आजीवन बंदीची शिक्षा झालेला पहिला क्रिकेटपटू... त्याला त्यासाठी कारावासाची शिक्षाही झाली. 2008मध्ये न्यायालयानं त्याच्यावरील आजीवन बंदी उठवली.

अता-उर-रेहमान ( 2000) - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रेहमानवर निलंबनाची कारवाई झाली होती. फिक्सरसोबत संपर्कात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. 2006मध्ये त्याच्यावरील बंदी उठली.

मोहम्मद आमीर ( 2011) - स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मोहम्मद आमीर दोषी आढळला. त्यानं सामन्यात जाणीवपूर्वक नो बॉल टाकले. त्याच्यावर 5 वर्षांच्या निलंबनाची कारवाई झाली.

मोहम्मद आसीफ ( 2011) - इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आसीफने जाणीवपूर्वक नो बॉल टाकले होते आणि त्याला 12 महिन्यांचा कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याच्यावर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली.

सलमान बट ( 2011) - इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भ्रष्टाचार करणारा आणखी एक पाकिस्तानी खेळाडू. त्याला अडीच वर्षांचा कारावास आणि 10 वर्षांच्या बंदीची शिक्षा झाली

दानिश कानेरिया ( 2010) - फिरकीपटूवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं आजीवन बंदी घातली. 2018मध्ये त्यानं फिक्सिंग केल्याचे कबुल केले.

शर्जील खान ( 2017) - पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू. त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली गेली.

उमर अकमल ( 2020) - पीसीबीनं फेब्रुवारी महिन्यात अकमलवर निलंबनाची कारवाई केली होती. फिक्सिंग संदर्भातील माहिती पीसीबीपासून लपवल्याचा त्याच्यावर आरोप होता. याच प्रकरणात तो दोषी आढळला असून त्याला तीन वर्ष सर्व क्रिकेट स्पर्धांपासून दूर रहावे लागणार आहे.