Join us

मुंबईविरुद्ध कोलकाताची विजयी सलामी

By admin | Updated: April 9, 2015 00:00 IST

Open in App

57 धावांची अर्धशतकी खेळणा-या कप्तान गौतम गंभीरने कोलकाताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. मुंबईच्या 168 धावांचं आव्हान कोलकाताने अवघे तीन गडी गमावत 18 षटकांमध्ये पार केले आणि आयपीएलची सलामीची लढत जिंकली.

कोलकाताच्या मॉर्नी मॉर्केलने 4 षटकांमध्ये अवघ्या 18 धावा देत 2 बळी घेतले आणि मुंबईवर नियंत्रण राखले.

अंबती रायडूला बाद केल्यानंतर जल्लोष करणारे कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू.

कोलकाता जिंकल्यावर पाठिराख्यांना अभिवादन करताना मुलीसह आलेला कोलकाता संघाचा मालक शाहरूख खान.

सूर्यकुमार यादवला मॅक्झिमम सिक्सेसचं बक्षीसही मिळालं.

तीन गडी राखून कोलकाता विजयी झाल्यावर खूश झालेले युसूफ पठाण आणि सूर्यकुमार यादव.

सूर्यकुमार यादवने नाबाद 46 धावा केल्या आणि कोलकाताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

मनीष पांडेने 40 धावा करत गौतम गंभीरला मोलाची साथ दिली.

मुंबईचा कर्णधार रोहीत शर्माने झंझावाती 98 धावांची खेळी केली आणि मुंबईला 168 धावांची सलामी मिळवून दिली परंतु ती व्यर्थ ठरली.