KKR च्या डॅशिंग ऑल राऊंडरची पत्नी 'सोशल मीडिया क्वीन'! तिच्या पोस्टने चढतो इंटरनेटचा पारा, बोल्डनेस असा की...

आपल्या स्फोटक फलंदाजीने जगाला वेड लावणाऱ्या आंद्रे रसेलची पत्नी खूपच ग्लॅमरस आहे.

आपल्या स्फोटक फलंदाजीने जगाला वेड लावणाऱ्या आंद्रे रसेलची पत्नी खूपच ग्लॅमरस आहे. ती तिच्या बोल्ड फोटोंनी लोकांचे लक्ष वेधून घेते. जस्सिम लोरा रसेल ही एक फॅशन मॉडेल तसेच सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी आहे.

इंस्टाग्रामवर जेसिम लोरा रसेलचे ३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा पारा चढला आहे. आंद्रे रसेल आणि जेसिम लोरा यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. दोघांना अमाया एस. रसेल नावाची मुलगी देखील आहे.

आयपीएलदरम्यान जेसिम लोरा अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे. ती तिचा नवरा आंद्रे रसेलला प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचते. आंद्रे रसेलप्रमाणेच जेसीमही भारतात लोकप्रिय आहे. २०१४ मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती.

जेसिम लोरा नुकतीच तिच्या एका पॅंटमुळे चर्चेत आली होती. प्रत्यक्षात जेसिम एका शोमध्ये पारदर्शक पँट घालून पोहोचली होती. त्यानंतर तिने त्या पारदर्शक काळ्या रंगाच्या पँटमधील तिचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

जेसिम अनेकदा वेगवेगळ्या ब्रँडसाठी बोल्ड फोटोशूट करून चर्चेत असते. ती अमेरिकेतील मियामी शहरातील रहिवासी आहे. तर आंद्रे रसेल हा जमैकाचा रहिवासी आहे. दोघांनी २०११ पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

वयाच्या १९ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणारी लोरा रसेल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. तिला पार्टी करणे आणि शॉपिंग करणे आवडते.