बाबो: २०२०त हेच होणं बाकी होतं; जसप्रीत बुमराहनं कमाईच्या बाबतीत विराट कोहलीलाही मागे टाकले

कोरोना व्हायरसच्या संकटाने २०२०मध्ये अनेकांना धक्के दिले. क्रीडा स्पर्धांनाही ब्रेक लावला. पण, वर्ष सरतासरता आणखी एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे.

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) २०२०वर्षात BCCIकडून सर्वाधिक मानधन घेतलं. याच वर्षी बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि यंदा त्यानं BCCIकडून १.३८ कोटी इतका पगार घेतला.

बुमराहनं कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. कोहली दुसरी कसोटी खेळला असता, तर कदाचित तो अव्वल स्थानावर कायम असता. पण आता त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल.

BCCIच्या A+ कॅटेगरीमधील तीन खेळाडूंमध्ये बुमराहचा समावेश आहे. या वर्षी त्यानं ४ कसोटी, ९ वन डे आणि ८ ट्वेंटी-20 सामने खेळले. भारतीय खेळाडूला एका कसोटीसाठी १५ लाख, वन डे साठी ६ लाख आणि ट्वेंटी-20साठी ३ लाख रुपये दिले जातात. बुमराहनं १.३८ कोटी कमावले ( यात वार्षिक कराराची रक्कम नाही).

या वर्षी कोहलीनं ३ कसोटी, ९ वन डे व १० ट्वेंटी-20 सामने खेळले आणि त्याला १.२९ कोटी रुपये मिळाले. तो दुसऱ्या स्थानावर आहे.

रवींद्र जडेजा २ कसोटी, ९ वन डे व ४ ट्वेंटी-20 खेळाडू ९६ लाखांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अखेरच्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांत मुकावे लागल्यानं तो एक कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही जागा पटकावू शकला नाही. न्यूझीलंड दौऱ्यातील दुखापतीनंतर रोहित मैदानापासून दूरच होता. यावर्षी त्यानं ३ वन डे व २ कसोटी सामनेच खेळले. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेरचे दोन कसोटी सामने खेळणार आहे. आतापर्यंत त्यानं ३ वन डे, ४ ट्वें-20 सामने खेळले आहेत.

Read in English