Big Breaking : Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणखी एका लीगमधील संघ खरेदी करणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात आयपीएलच्या 13व्या मोसमावरही अनिश्चितितेचं सावट आहे आणि त्यामुळे खेळाडूंवर आर्थिक संकट ओढावण्याची भीती आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत क्रिकेट स्पर्धांना सर्वाधिक फटका बसला आहे. आयपीएलच नव्हे तर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही संकट कायम आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे ( ECB) यंदा The Hundred ही लीग होणार होती, परंतु ती 2021मध्ये घेण्याचा निर्ण नुकताच घेतला गेला.

या निर्णयानंतर ECBनं लीगसाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंचे करारही रद्द केले आणि त्यामुळे खेळाडूंची आर्थिक कोंडी झाली.

अशा परिस्थितीत किंग खान आणखी एक संघ खरेदी करणार असल्याचे वृत्त समोर येत असल्यानं लीग आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

The Hundred लीग यंदा रद्द झाली असली तरी शाहरुखनं या लीगमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला आहे. दी टेलीग्राफनं या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

The Hundred लीग यंदा 17 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार होती.

कोलकोता नाइट रायडर्स संघाव्यतिरिक्त कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनिदाद फ्रँचायझीमध्ये 2015साली शाहरुखनं गुंतवणूक केली होती.

त्यामुळे The Hundred लीगमधील त्यानं गुतवणुक केल्यास तो तीन संघांचा मालक होईल.