Join us  

आयपीएल फायनल- हैदराबादचा सूर्योदय

By admin | Published: May 31, 2016 12:00 AM

Open in App

आयपीएलच्या ९व्या सत्रात धडाकेबाज खेळी करणा-या विराट कोहलीच्या एका चाहत्याचे हे विराटप्रेम...

लेग साइडला एक फटका लगावताना हैदराबादचा फलंदाज शिखर धवन.

आयपीएल फायनलमध्ये गोलंदाजी करणारा बंगळुरू संघाचा गोलंदाज शेन वॉटसन..

हैदराबाद वि. बंगळुरूचा हा अंतिम सामना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली. टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वेंकटेश हाही सामन्यास उपस्थित होता

यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला या वेळी क्रिकेट सम्राट सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु विराटला एका धावाने हा विक्रम मागे टाकण्यात अपयश आले. १९३० साली झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ९७४ धावा चोपल्या होत्या तर यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीने ९७३ धावा फटकावल्या.

आरसीबीकडून ख्रिस गेलने 4 चौकार आणि 8 षटकार खेचत सर्वाधिक 76 धावा कुटल्या

कर्णधार विराट कोहलीने ५४ धावा फटकावल्या मात्र त्याची ही खेळी आरसीबीला विजय मिळवून देू शकली नाही. धी आरसीबी संघ दोनवेळा (2009 आणि 2011) फायनलमध्ये पोहोचला होता यावेळी हॅटट्रिक करत ते फायनलमध्ये खेळले खरे मात्र हैदराबादच्या संघाच्या झंझावाती खेळामुळे यावर्षीही त्यांचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

आयपीएलचा विजयी कप उंचावतना कर्णधार डेव्हिड वॉर्नर...

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या अंतिम लढतीत आरसीबीसमोर विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य ठेवलं. वॉर्नरनं झंझावाती खेळीच्या जोरावर 8 चौकारांसह 3 षटकार लगावत 69 धावा फटकावल्या.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २०८ धावांचा डोंगर रचला. सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना विजयाला गवसणी घालण्यात आरसीबीला अपयश आलं आणि त्यांना 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा करता आल्या.

आयपीएलच्या ९ व्या सत्रातील अटीतटीच्या अंतिम फेरीत अखेर सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला ८ धावांनी नमवून आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं.