निता अंबानी, काव्या मारन ते प्रीती झिंटा; IPL 2024 Auctionमध्ये फ्रँचायझींकडून कोण कोण येणार?

IPL 2024 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे आणि त्यात ३३३ खेळाडूंवर बोली लागणार आहे. १० फ्रँचायझी ७० खेळाडूंसाठी जवळपास २६५ कोटी रुपये खर्च करणार आहेत. या लिलावासाठी १० फ्रँचायझींकडून कोण कोण उपस्थित असणार, हे जाणून घेऊया...

मुंबई इंडियन्स - निता अंबानी ( मालक) - इंडियन प्रीमिअऱ लीगच्या प्रत्येक ऑक्शनमध्ये निता अंबानी यांची उपस्थिती असतेच... संघबांधणीत त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे.

कोलकाता नाइट रायडर्स - जानवी मेहता - KKRची थिंक टँक असे जानवीला म्हटले जाते. फ्रँचायझीची सह मालकिण जुही चावला आणि जय मेहता यांची ती मुलगी आहे.

दिल्ली कॅपिटल्स- किरण कुमार गांधी ( सह मालक) - यांची स्ट्रॅटेजी अनेकांना थक्क करणारी ठरली आहे.

लखनौ सुपर जायंट - जस्टीन लँगर ( प्रशिक्षक) - ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. गौतम गंभीर याने LSGचे मेंटॉरपद सोडल्यामुळे आता लँगर यांच्या रणनीतीवर सर्वांचे लक्ष असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - अँडी फ्लॉवर ( रणनीतीकार) - झिम्बाब्वेच्या दिग्गज खेळाडूकडे आयपीएलमध्ये रणनीती ठरवण्याचा प्रचंड अनुभव आहे.

गुजरात टायटन्स - आशिष नेहरा ( प्रशिक्षक)- आयपीएल दरम्यान हातात कागदाचा तुकडा घेऊन फिरणाऱ्या नेहराचे डावपेच यशस्वी ठरलेले साऱ्यांनी पाहिले आहे. लिलावातही आता हार्दिकची रिप्लेसमेंट तो कोणत्या खेळाडूला घेऊन करतो याची उत्सुकता आहे.

राजस्थान रॉयल्स- कुमार संगकारा ( मुख्य प्रशिक्षक) - याचे हे तिसरे आयपीएल ऑक्शन असणार आहे. आणि शांत स्वभावाच्या संगकाराचे डावपेच सर्वांना अचंबित करणारे आहे.

चेन्नई सुपर किंग्स - काशी विश्वनाथन ( सीईओ) - ऑक्शनमध्ये सतत कानात हेडफोन घालून रणनीती ठरवणारे विश्वनाथन केव्हा कोणता डाव टाकतील याचा नेम बांधणे अवघड आहे

पंजाब किंग्स - प्रीती झिंटा ( सह मालक) - आयपीएल २०२२च्या ऑक्शननंतर प्रीती पुन्हा लिलाव प्रक्रियेत सहभाग घेणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद - काव्या मारन ( मालक) - काव्या मारनचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि सनरायझर्सचे सर्व निर्णय तिच घेते.