IPL 2023 Retention : Aman Khan साठी दिल्लीने शार्दूल ठाकूरला दिला डच्चू; कोण आहे अमन? श्रेयस अय्यरसोबत खास कनेक्शन

IPL 2023 Retention, Who is Aman Khan? : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे.

IPL 2023 Retention, Who is Aman Khan? : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे.

या ऑक्शनआधी काही संघ ट्रेडिंग विंडोतून काही खेळाडूंना आपापल्या ताफ्यात घेत आहेत आणि त्यात कोलकाता नाइट रायडर्सने ( Kolkata Knight Riders) आघाडी घेतली आहे. कोलकाताने ल्युकी फर्ग्युसन व रहमनुल्लाह गुर्बाझ यांना गुजरात टायटन्सकडून ट्रेंड केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दूल ठाकूरला आपल्या ताफ्यात घेतले. DC ने शार्दूलला KKRकडे सोपवताना २४ वर्षीय अमन खान ( Aman Khan) ला कोलकाता संघातून आपल्याकडे घेतले.

शार्दूल सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तेथे होणाऱ्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी १०.७५ कोटी रुपये मोजले आहेत. आता दिल्लीने शार्दूलला ट्रेड करून IPL 2023 Mini Auction साठी पर्समधील रक्कम १०.७५ कोटीने वाढवली आहे.

शार्दूलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स व पंजाब किंग्स हेही प्रयत्नशील होते, परंतु कोलकाताने बाजी मारली. आयपीएल २०२२ मध्ये शार्दूलने १४ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय त्याने १२० धावाही केल्या होत्या. शार्दूलच्या जागी दिल्लीने KKRच्या अमन खानला आपल्या संघात दाखल केले.

२५ वर्षीय अमनला आयपीएल २०२२च्या लिलावात KKR ने २० लाख रुपये मोजून करारबद्ध केले होते. अमन खान हा मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि वडिलांना त्याला जलदगती गोलंदाज बनवायचे होते. एक अपघात झाला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली, तरीही तो पुढच्या दिवशी १४ वर्षांखालील स्थानिक स्पर्धेत मैदानावर उतरला व ६० धावा केल्या.

प्रशिक्षक प्रविण आम्रे यांना त्याची जिद्द भावली आणि त्यांनी त्याला पुढच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले, हळुहळू तो संघाचा ओपनर बनला. मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात स्थान पटकाताना त्याने कूच बीहार ट्रॉफीत संधी मिळवली, परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली.

अमनने २०२०-२१मध्ये विजय हजारे ट्रॉफीतून मुंबईच्या सीनियर संघात पदार्पण केले. त्याने कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर येताना १८ चेंडूंत २५ धावा केल्या. २०२१-२२ पर्वात त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत पाच सामन्यांत मुंबईचे प्रतिनिधित्व केले.

सहा वर्षांपूर्वी आयपीएलसाठी त्याने ट्रायल दिली होती. २०१८मध्ये त्याने मुंबई ट्वेंटी-२० लीगमध्ये ४७ चेंडूंत ८५ धावा करताना सहा चौकार व सहा षटकार खेचले होते. या खेळी दरम्यान त्याने श्रेयस अय्यरसोबत १२७ धावांची भागीदारी केली होती.