IPL 2023: मॅच खेळू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूचे झालेले अपहरण, बोटं छाटण्याची धमकी; मोठा गौप्यस्फोट

IPL 2023: टीम इंडियाच्या सध्याच्या आघाडीच्या खेळाडूचं वयाच्या १४-१५ व्या वर्षी अपहरण झालं होतं. मोटारसायकलवरून आलेल्या काही मुलांनी त्याला पळवून नेलं आणि बोटे कापून टाकण्याची धमकी दिली होती. हे सर्व त्याने मॅच खेळू नये म्हणून करण्यात आले होते

भारताच्या यशस्वी फिरकीपटूंपैकी एक आर अश्विन याची ही स्टोरी आहे... बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सला दणदणीत विजय मिळवून दिला. अश्विनने बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करत संघाला आयपीएल २०२३ मधील तिसरा विजय मिळवून दिला.

आर अश्विनने २२ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत ४ षटकांत २१ धावा देत २ बळी घेतले. अश्विनच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने चेपॉकमध्ये २००८ नंतर पहिल्यांदाच चेन्नईचा पराभव केला.

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये अश्विनने खुलासा केला होता की, तो १४-१५ वर्षांचा असताना काही मुलांनी त्याचे अपहरण केले होते.

त्याने सांगितले की, तो टेनिस क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी जात होता. मला घेण्यासाठी दोन मुले दुचाकीवरून घरी आली. मी त्याच्यांसोबत निघालो. मला वाटले की ही मुले मॅचसाठी घेऊन जायला आली आहेत, परंतु त्यांनी मला चहाच्या दुकानात घेऊन गेले.

यानंतर त्यांनी अश्विनला सामना खेळण्यापासून रोखत असल्याचे सांगितले. अश्विनने अंतिम सामना खेळू नये असे त्यांना वाटत होते. अश्विनला त्या दोन मुलांनी त्याची बोटे छाटण्याची धमकीही दिली होती. अश्विनला ती मॅच खेळता आली नाही आणि मुलांनी त्याला सोडून दिले.