IPL 2023: CSKच्या बड्या क्रिकेटपटूची पत्नी करते स्पा मध्ये काम, दिवसाला कमावते लाखो

यंदाच्या IPL मध्ये ती पतीला सपोर्ट करायला स्टेडियममध्येही दिसणार आहे.

CSK Cricketer Spa Girl Love Story: क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नी यांची चर्चा होणं ही आता फारशी मोठी गोष्ट राहिलेली नाही. पूर्वी भारतात क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंड्स उघडपणे दिसत नव्हत्या. पण IPL सुरू झाल्यानंतर, ही गोष्टही दिसू लागली.

क्रिकेटला ग्लॅमरचा तडका म्हणजे IPL अशी एक वेगळी ओळख या स्पर्धेने पहिल्यापासूनच कमावली आहे. त्यात बडे-बडे सेलिब्रिटी असोत किंवा बॉलिवूड स्टार असोत.

पण सध्या चर्चा रंगलीय ती CSK मधील एका अशा ऑलराऊंडर क्रिकेटरची, ज्याचा एका स्पा मध्ये काम करणाऱ्या मुलीवर जीव जडला. इतकेच नव्हे तर त्याने तिच्याशी लग्नदेखील केलं.

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार ऑलराऊंडर ड्वेन प्रेटोरियस IPL 2023 साठी भारतात दाखल झाला आहे. त्याची पत्नी झिल्मा आणि मुलगाही सोबत आहे.

CSK ने ड्वेन प्रेटोरियसला ५० लाखांच्या बोलीसह आपल्या संघात स्थान दिले आहे. प्रेटोरियसची पत्नी झिल्मादेखील तिच्या पतीला सपोर्ट करण्यासाठी कामातून ब्रेक घेऊन भारतात आली आहे.

झिल्मा ही एक अत्यंत नामांकित बिझनेसवुमन आहे. तिचे स्वत:चे साऊथ आफ्रिकेमध्ये एका ख्यातनाम ब्रँडचे स्पा आहे. तेथे ती लेजर सर्विस एक्सपर्ट म्हणून काम करते.

झिल्माचे ग्राहकांसाठी पॅकेज हे तिच्या सेशन प्रमाणे असते. एका व्यक्तीकडून १० सेशनसाठी ती सुमारे १ लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे घेते.

काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत एका ब्यूटी बुटीकसोबत भागीदारी केल्याचे सांगितले.

झिल्मा आणि ड्वेन दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. त्याआधी काही वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये झिल्माने हानलु नावाच्या मुलाला जन्म दिला.