IPL 2022 play-off scenarios: ५६ सामने झाले अन् मुंबई इंडियन्सनेच गुंडाळलाय गाशा; जाणून घ्या प्ले ऑफच्या लढतीत कोणाच्या किती आशा

IPL 2022 play-off scenarios : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होण्याचा पहिला मान मुंबई इंडियन्सला मिळाला. आयपीएलच्या एका पर्वात प्रथमच मुंबईने ९ लढती गमावल्या. लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) हे नव्याने दाखल झालेले दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर आहेत. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स यांची मक्तेदारी मोडून या दोन्ही संघांनी गरूड झेप घेतली आहे. ५६ सामने होऊनही फक्त एकच संघ बाद झाला आहे आणि उर्वरित ९ संघ अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत.

उर्वरित लढती - लखनौ सुपर जायंट्स ( १० मे), चेन्नई सुपर किंग्स ( १५ मे), रॉयल चॅलेंजर्स बंगळुर ( १९ मे); त्यांनाही प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. त्यांनी दोन विजय मिळवल्यास ते २० गुमांसह टॉप टू मधील स्थान पक्के करतील.

उर्वरित लढती - गुजरात टायटन्स ( १० मे) , राजस्थान रॉयल्स ( १५ मे) व कोलकाता नाईट रायडर्स ( १८ मे); या तीनपैकी एक सामना जिंकून लखनौ १८ गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्के करू शकणार आहे. त्यांनी जर दोन सामने जिंकले तर टॉप टू मधील त्यांचे स्थान पक्के होईल.

उर्वरित लढती - दिल्ली क‌ॅपिटल्स ( ११ मे), लखनौ सुपर जायंट्स ( १५ मे) व चेन्नई सुपर किंग्स ( २० मे); प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी त्यांना एक विजय पुरेसा आहे कारण त्यांचा नेट रन रेटही इतरांपेक्षा चांगला आहे. पण, त्यांनी जर तीनही सामने जिंकले, तर २० गुणांसह ते टॉप टू मध्ये येऊ शकतात. गुजरात व राजस्थान यांच्यात नेट रन रेटवर चढाओढ रंगेल.

उर्वरित लढती - पंजाब किंग्स ( १३ मे) व गुजरात टायटन्स ( १९ मे); प्ले ऑफसाठी RCBला किमान १८ गुण तरी मिळवावे लागतील आणि त्यासाठी त्यांना दोन्ही लढती जिंकणे महत्त्वाच्या आहेत. त्यांनी एकच लढत जिंकली, तर दिल्ली, हैदराबाद व पंजाब यांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. RCBचा नेट रन रेट -०.११५ असा आहे आणि अशा परिस्थितीत तो त्यांचा विरोधात जाऊ शकते. दिल्ली व हैदराबादचा नेट रन रेट त्यांच्यापेक्षा चांगला आहे.

उर्वरित लढती - राजस्थान रॉयल्स ( ११ मे), पंजाब किंग्स ( १६ मे) व मुंबई इंडियन्स ( २१ मे); RCBचा एक पराभव अन् दिल्ली कॅपिटल्सच्या आशा पल्लवीत होतील. दिल्लीने तीनही लढत जिंकल्या तर त्यांचे १६ गुण होतील. त्यांचा नेट रन रेट हा + ०.१५० असा आहे. पण, जर राजस्थान व बंगळुरू यांचे दोघांचेही १८ गुण झाल्यास दिल्लीचा पत्ता कट होईल.

उर्वरित लढती - कोलकाता नाईट रायडर्स ( १४ मे), मुंबई इंडियन्स ( १७ मे) व पंजाब किंग्स ( २२ मे); दिल्ली प्रमाणे हैदराबादही RCBच्या पराभवासाठी प्रार्थना करतोय. RCB ने एक सामना गमावला आणि दिल्लीही हरली. तर हैदराबादला तीनही सामने जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येईल. दिल्लीने दोन सामने गमावल्यास त्यांचा मार्ग अधिक सोपा होईल.

उर्वरित लढती- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १३ मे), दिल्ली कॅपिटल्स ( १६ मे), सनरायझर्स हैदराबाद ( २२ मे); १० गुण असलेल्या तीन संघांपैकी हाही एक संघ आहे. RCBने एक सामना गमावल्यास पंजाब किंग्स शर्यतीत राहू शकतो. त्यांचा नेट रन रेट -०.२३१ असा आहे आणि त्यांच्यासमोर आता उर्वरित तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पंजाबने तीन सामने जिंकल्यास त्यांची थेट स्पर्धा RCBसोबत होईल. RCB व पंजाबचे 16 गुण होती आणि नेट रन रेटच्या जोरावर यापैकी एक संघ अव्वल चौघांत जाईल.

उर्वरित लढती - मुंबई इंडियन्स ( १२ मे) , गुजरात टायटन्स ( १५ मे), राजस्थान रॉयल्स ( २० मे); गतविजेत्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचणे थोडे अवघडच आहे. ते जास्तीतजास्त १४ गुणांची कमाई करू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना RCBचे दोन पराभव, दिल्ली, हैदराबाद व पंजाब यांचा प्रत्येक एक पराभव तोही मोठ्या फरकाने हवा आहे. RCB ने एकही सामना जिंकला तर CSK बाद होईल.

उर्वरित लढती - सनरायझर्स हैदराबाद ( १४ मे) व लखनौ सुपर जायंट्स ( १८ मे); कोलकातालाही RCBच्या पराभवाची प्रतीक्षा आहे. हा संघ जास्तीतजास्त १४ गुण कमवू शकतो. पुढील गणित नेट रन रेट व अन्य संघांच्या कामगिरीवर आहे.