Mayanti Langer, IPL 2022: देखो वो आ गई... चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार! मयंती पुन्हा IPL अँकरच्या रूपात दिसणार!

मयंतीने 'स्टार अँकर' म्हणून नावारूपास आली आहे. तिने अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम अँकरिंग केलं आहे.

Mayanti Langer IPL 2022: अनुभवी टेलिव्हिजन अँकर आणि क्रिकेटमधील प्रसिद्ध चेहरा असलेली मयंती लँगर आता पुनरागमन करणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ती पुन्हा चाहत्यांना दिसणार असून आगामी हंगामापूर्वी ती दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

तिने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मामुळे ती IPL च्या दोन सीझनमध्ये दिसली नव्हती. पण आता मात्र मयंती लँगर पुन्हा एकदा आयपीएलच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग बनण्यास सज्ज झाली आहे.

IPL च्या 2020 सीझनमध्ये जेव्हा मयंती दिसली नाही, तेव्हा जगभरातील अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्या मुद्द्यावरून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लढवले.

पण मग काही दिवसांनी मयंतीनेच या चर्चांना पूर्णविराम दिला. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आपण आई होणार असल्याची गोड बातमी साऱ्यांना दिली, त्यानंतर चर्चा बंद झाल्या. भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीसोबत तिने लग्न केले आहे.

"तुम्हा साऱ्यांचं प्रेम माझ्यावर आहे याची मला कल्पना आहे. मी गेली पाच वर्षे स्टार समूहासोबत मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये अँकर म्हणून तुमच्यासमोर आले आहे. पण सहा आठवड्यांपूर्वीच मी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे."

"मुल झाल्यानंतर माझं आयुष्य त्याच्याभोवतीच फिरतंय. त्यामुळे मी काही काळ कामकाजापासून दूर आहे. स्टार समूहाने मला आवश्यक त्यावेळी सर्वतोपरि सहकार्य केलं. त्यामुळे त्यांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते", अशी पोस्ट लिहून तिने चर्चांना पूर्णविराम दिला होता.