Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हे खेळाडू ठरले गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक जेतेपदाचे खरे शिल्पकार!

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले.

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. दोन जीवदान मिळालेल्या शुबमन गिलने ( Shubman Gill) नाबाद ४५ धावांची खेळी केली आणि डेव्हिड मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा करून गुजरातचा विजय निश्चित केला.

गुजरात टायटन्सने १३१ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत सहज पार केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २) हे झटपट बाद झाले. जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. शिमरोन हेटमायर ( ११), आर अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) व रियान पराग ( १५) हे फार कमाल करू शकले नाही.

हार्दिक पांड्याने १७ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात शुबमन गिलला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. वृद्धीमान साहा ( ५) व मॅथ्यू वेड ( ८) माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या व शुबमन यांन ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला. गिल ४३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या.

हार्दिक पांड्या - १५ सामने, ४८७ धावा, ४४.२७ सरासरी आणि ८ विकेट्स

शुबमन गिल - १६ सामने, ४८३ धावा, ३४.५० सरासरी

डेव्हिड मिलर - १६ सामने, ४८१ धावा, ६८.७१ सरासरी

वृद्धीमान साहा - ११ सामने, ३१७ धावा, ३१,७० सरासरी

राहुल तेवातिया ( २१७ धावा), मॅथ्यू वेड ( १५७) व साई सुदर्शन ( १४५ )

मोहम्मद शमी - १६ सामने, २० विकेट्स

राशिद खान - १६ सामने, १९ विकेट्स

ल्युकी फर्ग्युसन ( १२ विकेट्स) व यश दयाल ( ११ विकेट्स)