No Ball Controversy IPL 2022 DC vs RR Live Updates : DC प्रशिक्षक Shane Watson याने Rishabh Pant ला झापले; मैदानावर घातलेल्या राड्यानंतर तीव्र नाराजी

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या विजयाऐवजी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याने घातलेल्या राड्याचीच चर्चा अधिक रंगली.

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या विजयाऐवजी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याने घातलेल्या राड्याचीच चर्चा अधिक रंगली. राजस्थानच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली टक्कर दिली, परंतु अखेरच्या षटकात नाट्यमय घडामोड रंगली आणि त्यावरून नाराज झालेल्या DC चा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन ( Shane Watson) याने रिषभला झापले.

राजस्थान रॉयल्सने ( RR) वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) दणदणीत विजयाची नोंद केली. जोस बटलरचे ( Jos Buttler ) शतक अन् संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कलच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने IPL 2022 मधील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. त्यानंतर आर अश्विन व प्रसिद्ध कृष्णा यांनी दिल्लीला धक्के दिले.

जोस बटलरच्या ११६ धावा, देवदत्त पडिक्कलच्या ५४ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ ( ३७) , डेव्हिड वॉर्नर ( २८), रिषभ पंत ( ४४) व ललित यादव ( ३७) व रोव्हमन पॉवेल ( ३६) यांनी दमदार खेळ केला. दिल्लीला ८ बाद २०७ धावाच करता आल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर आर अश्विनने दोन विकेट्स घेतल्या.

प्रसिद्धने १९वे षटक निर्धाव फेकून दिल्लीच्या संघर्षाची हवाच काढली. पण, अखेरच्या षटकात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ६ चेंडूंत ३६ धावांची गरज असताना दिल्लीच्या रोव्हमन पॉवेलने तीन चेंडूंवर खणखणीत षटकार खेचले.

तिसऱ्या चेंडूनंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत भडकला. त्याने त्याच्या फलंदाजांना मैदान सोडून माघारी येण्याचा इशारा केला. वानखेडे स्टेडियमवर चिटर चिटरचा नारा घुमला. दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आम्रे डग आऊट सोडून मैदानावर अम्पायरशी हुज्जत घालण्यासाठी धावले.

ओबेय मकॉयने टाकलेला फुलटॉस चेंडू नो असल्याचा दावा दिल्लीच्या चमूने केला आणि ते त्यांच्या मतावर ठाम होते. युजवेंद्र चहल खेळपट्टीवर फलंदाजीला असलेल्या कुलदीप यादवची समज काढत होता. तर चिडलेल्या रिषभसोबत सीमारेषेवर असेलला जोस बटलर वाद घालताना दिसला. या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णयावर बोट ठेवण्यात आले.

तिसरा चेंडू फुलटॉस असल्याने तो No Ball द्यावा अशी मागणी DCच्या डग आऊटमधून झाली. रिषभने फलंदाजांना माघारी बोलावले आणि सपोर्ट स्टाफ प्रविण आम्रे मैदानावर धावत जाताना अम्पायरशी हुज्जत घालताना दिसले.

शेन वॉटसन म्हणाला, अखेरच्या षटकात जे काही घडले त्याने मी निराश झालो. दिल्ली कॅपिटल्सने असा पवित्रा घ्यायला नको हवा होता. अम्पायरचा निर्णय बरोबर असो किंवा नाही, तो मान्य करायला हवा. मैदानावर जाऊन हुज्जत घालणे चांगले नाही.