IPL 2021 : तुफान फॉर्मात असलेला फलंदाज RCBच्या ताफ्यात, मागील तीन सामन्यांत कुटल्या १८१ चेंडूंत २९२ धावा!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स, माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स हे संघ दुबईत दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज दुबईत दाखल होईल.

संयुक्त अऱब अमिराती येथे ( UAE) 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघानंही तीन नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा हा दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार नाही. त्याच्या जागी RCBनं श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केले आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर वनिंदू हसरंगानं दमदार कामगिरी केली होती.

वनिंदूच्या फिरकीचा सामना करताना भारताचे फलंदाज चाचपडले होते. त्यानं तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण १० विकेट्स घेतल्या. तिसऱ्या ट्वेंटी-२०त त्यानं ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

याचसोबत दुसऱ्या टप्प्यात सायमन कॅटिचनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे माईक हेसन यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. दुष्मंथा चमिरा व टीम डेव्हिड हे केन रिचर्डसन व फिन अॅलन यांना रिप्लेस करणार आहेत.

यामध्ये टीम डेव्हिड हे सर्वांसाठी नवं नाव आहे. हार्ड हिटिंग फलंदाज आणि गोलंदाज असलेला अष्पटैलू टीम हेव्हिड हा सिंगापूरचा स्टार खेळाडू आहे. जगभरातील ट्वेंटी-२० स्पर्धांमध्ये त्यानं स्वतःचं नाव कमावलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या रॉयल लंडन वन डे स्पर्धेत त्यान तीन सामन्यांत 140*(70), 52*(38) & 102(73) अशा धावा कुटल्या आहेत. त्याच्या समावेशनं RCBच्या मधळ्या फळीला मजबूती मिळणार आहे.

टीम डेव्हिडनं ४९ ट्वेंटी-२० सामन्यांत ११७१ धावा केल्या आहेत नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या आगमनानंतर RCB कडे एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, हसरंगा, चमिरा, डॅन ख्रिस्टियन आणि कायले जेमिन्सन असे परदेशी खेळाडू आहेत.