IPLच्या स्टायलिस्ट अँकरनं केलीय हवा; तमन्ना वाहीचे फोटो पाहून विसराल मयांती अन् संजना गणेसनला!

इंडियन प्रीमिअर लीग म्हटलं की ग्लॅमरचा तडका आलाच... त्यात यूएईत सुरू असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आल्यानंतर कॅमेरामनच्या नजरा प्रेक्षकांमधील सुंदर चेहऱ्या टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात.. पण, या कॅमेरासमोर वारंवार येणाऱ्या एका चेहऱ्यानं सर्वांचे लक्ष वेधले आहे आणि तिची सुंदरता पाहून मयांती लँगर व संजना गणेसन या स्टार महिला अँकरचा विसर पडला तर आश्चर्य वाटायला नको..

IPL 2021च्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ प्रवेश करतील हे दोन आठवड्यांनंतर स्पष्ट होईल. पण, सध्या चर्चा सुरूय ती तमन्ना वाहीची ( Tamanna Wahi)... चला जाणून घेऊया कोण आहे ती...

तमन्ना वाही ही प्रोफेशनल अँकर, प्रेझेंटर आहे. अबुधाबीतच तिचा जन्म झाला आणि ती तिथेच राहतेय.

ब्लॉग लिहिण्यापलिकडे ती Kadak FM मध्ये २०१३पासून काम करतेय

२०१६मध्ये तिला एशियन ब्लॉगरचा पुरस्कार मिळाला होता.

आयपीएल २०२०च्या वेळी यूएईची माहिती देताना तमन्ना चर्चेत आली होती.

बॉलिवूड चित्रपट तिला फार आवडतात आणि कभी खुशी कभी गम हा तिचा आवडता चित्रपट आहे