IPL 2021 : 7 व्या महिन्याची भन्नाट थीम, आजोबा, बाप अन् चिमुकलाही धोनीचा 'जबरा' फॅन

अतिशय भन्नाट आणि कल्पनाधारीत फोटोशूट अनेक चाहत्यांना भुरळ घालत आहे. त्यामुळेच, सोशल मीडियावर हे क्रिकेटंचं बेबी फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे.

आयपीएलच्या 14 व्या सिझनला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. क्रिकेट चाहत्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपली नजर रोखली आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंह धोनीची चेन्नई आणि रोहितच्या मुंबई यांच्यात रंगला होता. मुंबई आणि चेन्नई म्हटलं की महाराष्ट्रात फॅन्समध्येही स्पर्धा चालते.

महाराष्ट्राचे म्हणून मुंबईचे चाहते आणि धोनचे चाहते म्हणून चेन्नईला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये चांगलीच खुन्नस पाहायला मिळते. त्यामुळे, आपल्या चाहत्या क्रिकेटर्स आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी फॅन्स एक पाऊल पुढे असतात.

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीतील सागर तातेड हे धोनीचा जबरा फॅन आहेत. धोनीच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सागर यांनी भन्नाट आयडिया लढवल्याचं दिसून आलं.

सागर यांचा चिमुकला सारंग याच महिन्यात 7 महिन्यांचा झाला आहे, त्यामुळे बापमाणूस असलेल्या सागरने लाडक्या लेकाचं बेबी फोटोशूट करताना माही अन् सीएसकेची भन्नाट थीम वापरली.

MS धोनीचा 7 नंबर आणि क्रिकेटचं मैदानच आपल्या घरी उतरवलं. त्यामध्ये, आपल्या लाडक्या बाळाला ठेवून फोटोशूटही केलं. सागरच्या या आयडियाची धोनी चाहत्यांकडून प्रशंसा होत आहे.

सागर तातेड यांनी चिमुकल्या सागरसाठी 7 नंबरची चेन्नई सुपर किंग्जची जर्सी आणली होती. या जर्सीसोबतच स्टम्प, मॅट, क्रिकेटचं गोलाकार मैदान आणि धोनीची छायाचित्रही डेकोरेट केली.

अतिशय भन्नाट आणि कल्पनाधारीत फोटोशूट अनेक चाहत्यांना भुरळ घालत आहे. त्यामुळेच, सोशल मीडियावर हे क्रिकेटंचं बेबी फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे.

सागर तातेड हे धोनीचे चाहते आहेत, त्यासोबतच त्यांचे वडिल बाळासाहेब तातेड हेही धोनीचे जबरा फॅन आहेत. त्यामुळेच, धोनीच्या संघाने मॅच जिंकल्यानंतर त्यांचं फॅमिली सेलिबेशन ठरलेलंच असतं.

लहानपणापासून आपल्या लेकाला क्रिकेटची गोडी लावणारा हा बाप अतिशय स्पोर्टी व्यक्तीमत्व आहे, त्यामुळेच मुलाची आवड असेल तर त्यास क्रिकेटचे धडे देण्याचा सागर तातेड याचा मानस आहे.