International women's day - क्रिकेटपटूची 'पत्नी' यापलिकडे आहे 'तिची' स्वतःची 'ओळख'; कुणी डॉक्टर, कुणी टेनिसपटू तर कुणी अभिनेत्री

International women's day - भारतीय क्रिकेटपटूची पत्नी... अशीच तिची ओळख करून दिली जाते... सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली, विराट कोहलीची पत्नी अनुष्का, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा... हिची तिची ओळख बनली आहे. यात तिची खरी ओळख विसरूनच गेली आहे... क्रिकेटपटूची पत्नी यापलिकडे त्यांची एक स्वतःची ओळख आहे...

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) - बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती, ही खरी अनुष्काची ओळख आहे. रब ने बना दी जोडी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ती Clean Slate Films या कंपनीची सह मालकीण आहे आणि २०१३ मध्ये तिने पहिला चित्रपट प्रोड्युस केला. पाताल लोक व बुलबुल हे तिचे प्रोजेक्ट आहे.

रितिका सजदेह ( Ritika Sajdeh ) - रितिका स्पोर्ट्स मॅनेजर आहे आणि तिची कंपनी अनेक खेळाडूंच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडते. खेळाडूंचे ब्रँड एंडॉर्समेंट आणि कॉन्ट्रॅक्टही तिची कंपनी बघते. रोहित शर्मा व तिची भेट एका जाहीरातीच्या शूटींग दरम्यान झाली. २०१५ मध्ये तिने रोहितसह लग्न केलं.

संजना गणेसन ( Sanjana Ganesan) - संजना गणेसन ही स्पोर्ट्स प्रेसेंटर आहे आणि टीव्ही होस्ट आहे. २०१८च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत स्टार स्पोर्ट्ससाठी तिने अँकरींग केले होते. मॉडलिंगमधून तिने करियरची सुरुवात केली. २०१२ मध्ये ती फेमिना स्टाईल दिव्हा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. २०१३मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. २०२१मध्ये तिने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहशी लग्न केलं.

साक्षी सिंग धोनी ( Sakshi Singh Dhoni) - महेंद्रसिंग धोनीशी लग्न करण्यापूर्वी साक्षी ताज बंगाल हॉटेलमध्ये काम करायची. साक्षी धोनी 'Sakhi Rawat Foundation 'च्या माध्यमातून अनाथांसाठी काम करते.

प्रियांका चौधरी ( Priyanka Chaudhary) - प्रियांका विप्रो लिमिटेड कंपनीत कामाला होती. २००९मध्ये तिने अँम्स्टरडॅममधील ING कंपनीत काम करत होती. सुरेश रैनासोबत लग्न केल्यानंतर तिने काम करणं सोडलं, परंतु एका NGOच्या माध्यमातून ती गरजवंतांना मदत करते.

अंजली तेंडुलकर ( Anjali Tendulkar ) - अंजली तेंडुलकर व्यावसायाने Paediatrician आहेत. ग्रँट मेडिकल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने जेजे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस केली. SRT Sports Management Pvt Ltd. या कंपनीची ती सह मालकिण आहे. कुटुंबासाठी तिने आपलं करियर सोडलं

दीपिका पल्लिकल ( Dipika Pallikal) - भारताची नंबर वन स्क्वॉशपटू आहे दीपिका... २०१५ मध्ये तिने दिनेश कार्तिकसोबत लग्न केलं.... PSA महिला रँकिंगमध्ये टॉप १० मध्ये स्थान पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी ती पहिली महिला स्क्वॉशपटू आहे. २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने व जोश्ना चिनप्पा यांनी सुवर्णपदक जिंकले.

हेझल किच ( Hazel Keech) - ब्रिटिश-मॉरिशियन मॉडल असलेल्या हेझलने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. २००५मध्ये तिला मॉडेलिंग साठी बऱ्याच ऑफर होत्या. बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने सह कलाकाराच्या भूमिका निभावल्या आहेत. बिग बॉस ७ सिझनमध्ये ती होती. २०१६मध्ये तिने युवराज सिंगसोबत लग्न केलं.

मयांती लँगर ( Mayanti Langer ) - क्रीडा पत्रकार असलेल्या मयांतीने स्टार स्पोर्ट्सवर आपल्या अँकरिंगने सर्वांना प्रेमात पाडले. तिने २०१५चा वर्ल्ड कप, २०१८ ची आयपीएल, २०१४ ची इंडियन सुपर लीग, २०११ चा वर्ल्ड कप यांचे सूत्रसंचालन केले आहे.

सागरिका घाटगे ( Sagarika Ghatge ) - राष्ट्रीय हॉकीपटू व मॉडेल अशी सागरिकाची खरी ओळख. चक दे इंडिया या चित्रपटात तिने काम केले आहे. २०१५मध्ये तिने खतरोंके खिलाडी मध्ये सहभाग घेतला होता आणि ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.

नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic ) - मॉडेल, अभिनेत्री, डान्सर अशी नताशाची ओळख... सत्याग्रह या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर फुकरे रिटर्न्स व झिरो या चित्रपटांतही ती दिसली होती. बिग बॉसमध्येही तिने सहभाग घेतला होता.

शितल गौथम ( Sheetal Goutham) - रॉबिन उथप्पाची पत्नी शितर गौथम ही टेनिसपटू आहे. ९ व्या वर्षी तिने टेनिस खेळण्यास सुरुवात केली. तिच्या नावावर ५ ITF एकेरी आणि १३ ITF दुहेरी जेतेपदं आहेत.

सफा बैग ( Safa Baig ) - इराफान पठाणशी लग्न करण्याआधी सफा बैग ही सौदी अरेबियातील प्रसिद्ध मॉडेल होती.

धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) - धनश्री वर्मा व्यावसायाने डान्सर व कोरिओग्राफर आहे.