क्रिकेटपटूंवर होता राग, पण टीम इंडियाच्या यष्टिरक्षकावर जडला जीव; दोनवेळा केलं लग्न

दिग्गज स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल ही प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन महिला क्रमवारीत टॉप-१० मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याच्यासोबत तिनं लग्न केलं.

दिग्गज स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल ही प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन महिला क्रमवारीत टॉप-१० मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याच्यासोबत तिनं लग्न केलं. क्रिकेटपटूंचा राग राग करणारी दीपिका हिला पटवण्यासाठी भारतीय खेळाडूने खूप मेहनत घेतली.

दीपिकाच्या आईच्या ट्रॅव्हल एजन्सीमधून तिकीट बुक करत असताना दिनेश कार्तिक जावई बनला. पण, ही पूर्ण गोष्ट नाही. दिनेशची पत्नी होण्यापूर्वी दीपिका केवळ स्टार खेळाडूच नव्हती तर तिला क्रिकेटचाही तिरस्कार होता. अशा परिस्थितीत दोन विरुद्धार्थी व्यक्तींना एकत्र येणे सोपे नक्कीच नव्हते.

दीपिका पल्लीकलच्या क्रिकेट द्वेषामागील कारण आधी जाणून घ्या. दीपिकाची आई सुसान इटिचेरिया ही माजी क्रिकेटपटू असून तिने भारताकडून सामनेही खेळले आहेत. असे असूनही दीपिकाला हा खेळ आवडला नाही. दीपिकाच्या म्हणण्यानुसार, मी खूप मेहनत घ्यायचे, विजयांची नोंद करायचे, पण वर्तमानपत्रात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दलच चर्चा असायची.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांची २०१२ मध्ये इंग्लंडला भेट झाली . दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की, तिची आणि दिनेशची आई एकमेकांना ओळखत होती. दिनेशने मला अनेकवेळा मॅसेज करून जेवायला विचारले, पण मी नेहमीच टाळले. एक दिवस मी जिममध्ये होते, दिनेशही तिथे आला. आम्ही काही वेळ बोललो.

तुमचा कल दिनेश कार्तिककडे कसा झुकला? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, मी एकदा इंग्लंडमध्ये होते, दिनेशही तिथे पोहोचला. तो फक्त मला भेटायला आला होता. मला प्रभावित करण्यासाठी दिनेश माझ्यासोबत स्क्वॉशही खेळला. तेव्हा मला कळले की, क्रिकेट व्यतिरिक्त दिनेश एक चांगला स्क्वॉशपटू आहे.

दीपिकाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी मला समजले की तो एक काळजी घेणारा व्यक्ती आहे. आम्हा दोघांचं काहीतरी होऊ शकतं. यानंतर अनेक भेटींमध्ये खूप बोलून आम्ही एकमेकांना चांगले ओळखले.

दिनेश कार्तिक जेव्हा दीपिकाला भेटला तेव्हा तो आतून तुटला होता. त्याची पहिली पत्नी निकिताने त्याला सोडून मुरली विजयसोबत संसार थाटला होता. निकितासोबत घटस्फोट घेतल्यानंतर १८ ऑगस्ट २०१५ रोजी दिनेशने दीपिकासोबत लग्न केले. दिनेश आणि दीपिका यांनी एकदा ख्रिश्चन आणि एकदा हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.

दीपिका आणि दिनेश यांच्या घरी जुळ्या मुलांनी जन्म घेतला. दोन मुलांची आई झाल्यानंतर स्क्वॉश कोर्टवर परतलेल्या दीपिका पल्लीकलने World doubles championships स्पर्धेत मिश्र व महिला दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले.