मुंबई विमानतळावर भारतीय खेळाडूंची धमाल !

ऑस्ट्रेलियाला दौऱ्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी रवाना झाला. 21 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 होणार आहे. ब्रिस्बेन येथे दाखल होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर भारतीय संघ रिलॅक्स मूडमध्ये दिसले. यावेळी कर्णधार विराट कोहलीसोबत फोटो काढण्याची संधी चाहत्यांनी दवडली नाही.

मनीष पांडे आणि कृणाल पांड्या यांनी मोबाईल गेम खेळण्यावर भर दिला.

सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाज जस्प्रीत बुमरा हे रिलॅक्स मुडमध्ये दिसले.

रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक दिनेश कार्तिक यांच्यातील मस्ती पाहण्यासारखी होती.

सर्व सहकाऱ्यांनी एकत्र फोटो काढण्याची संधी सोडली नाही.